पाचोरा येथील जिजामाता कॉलनी या बोर्डाचे अनावरण पाचोरा तालुक्याचे आ. श्री किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

पाचोरा येथील जिजामाता कॉलनी या बोर्डाचे अनावरण पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

(पाचोरा प्रतिनिधि )

पाचोरा येथील डाक बंगला जवळील जिजामाता कॉलनी असून त्या कॉलनी चे नाव साधारणता तीस वर्षापूर्वी नगरपालिकेने ठराव करून जिजामाता कॉलनी असे नाव दिले होते व त्यावेळी बोर्डाचे उद्घाटन केले होते. पण काही वर्षानंतर तो बोर्ड दिसत नव्हता त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जिजामाता कॉलनी लक्षात येत नव्हती त्यामुळे त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व इलेक्ट्रिक विद्युतदुत वायरमन श्री किशोर माळवे यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने जिजामाता कॉलनी असा बोर्ड तयार केला व पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील पाचोरा चे उद्योगपती माननीय श्री मुकुंद आण्णा बिल्डीकर पाचोरा शिवसेना शहर प्रमुख किशोर भाऊ बारावकर व सामाजिक कार्यकर्ते श्री निळकंठ पाटील, ॲड दिपक पाटील, श्री साहेबराव सौदाणे, श्री निकित पाटील, श्री दिलीप पाटील, श्री छोटू बडगुजर, श्री भाऊसाहेब पाटील, श्री संदीप पाटील, श्री अशोक बागड, अतुल पवार, श्री रवी पाटील, श्री अंबालाल पवार, सर श्री मुकेश राणे श्री देविदास चौधरी श्री राज पवार श्री संदीप अहिरे श्री गणेश पांडे हे स्थानिक नागरीक उपस्थित होते.