‘आपुलकीचे एक पाऊल’ उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत उबदार कपड्यांचे वाटप

‘आपुलकीचे एक पाऊल’ उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत उबदार कपड्यांचे वाटप

चोपडा: दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी ‘आपुलकीचे एक पाऊल’ या उपक्रमाअंतर्गत चोपडा येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकाकामार्फत विशेष हिवाळी शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यातीलच एक उपक्रम *आपुलकीचे एक पाऊल* या उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप श्रीमती.प्राची साळुंखे जाधव (वृत्त्त निवेदिका, न्यूज १८ लोकमत) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी श. पा. माध्य. आश्रम शाळेचे प्राचार्य श्री. दिलीप सावकरे, कर्जाने वी. प्र. देशमुख प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र आखाडे व डॉ. लालचंद पटले आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सदर उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिराच्या नियोजनासाठी व कृती कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिताताई संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. के. लभाणे, सहा.अधिकारी डॉ. पी. एन.सौदागर, श्री. बी. एच देवरे व श्रीमती एस. बी. पाटील यांनी परिश्रम घेतले.