नांद्रा येथील माधवराव सुर्यवंशी यांचे दात्रूत्व गावासाठी गेल्या आठ वर्षांपासून निःशुल्क पाणी पुरवठा

नांद्रा येथील माधवराव सुर्यवंशी यांचे दात्रूत्व गावासाठी गेल्या आठ वर्षांपासून निःशुल्क पाणीपुरवठा.तिव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी हातभार.

नांद्रा(ता.पाचोरा)ता.30येथील आदर्श शेतकरी माधवराव हिरामण सुर्यवंशी यांनी वरसाडे येथुन गिरणा नदीवरुण हडसन नांद्रा रस्त्यावरील शेतीसाठी पाईप लाईन ने पाणी आणले आहे.दोन हजार चौदा पासून म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून हा पाणीपुरवठा आणण्यात आलेला आहे.तेव्हा पासून गावातील लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने त्यांनी मुख्य पाईप लाईन पासून दिड किलोमीटर अंतरावरून दोन इंची ची पाईप लाईनने गावात तीन ठिकाणी पाण्याचे तीन नळ कनेक्शन स्वखर्चाने करून दिलेले आहेत.त्यात एक कनेक्शन खालच्या गल्लीत संजय सुर्यवंशी यांच्या घराजवळ दुसरे कनेक्शन बोरसे गल्लीत तर तिसरे कनेक्शन हे उंबर चौक या गल्ली साठी काढून दिलेले आहेत.सद्ध्या गिरणा नदी आटल्याने गावातील पाणीपुरवठा विलंबाने होत असल्याने गावातील महिला वर्गाला या नळांवरुण पाणी उपलब्ध होत असल्याने पाणीटंचाई ची दाहकता काही सी कमी झालेली आहे.या दात्रूत्वाचे आदर्श शेतकरी श्री माधवराव सुर्यवंशी यांचे कौतुक होत आहे. कोट. गावातील लोकांना आपल्या माध्यमातून काही तरी सामाजिक कार्य व्हावे या उद्देशाने मी 2014 पासुन स्वखर्चाने दोन इंचीचे तीन कनेक्शन काढून दिलेले आहेत.त्यांचा ग्रामस्थांना फायदा होत आहे.याचे मला समाधान आहे. आदर्श शेतकरी माधवराव सुर्यवंशी नांद्रा (ता.पाचोरा) फोटो ओळ…………नांद्रा(ता.पाचोरा) येथील उंबर चौक गल्लीतील श्री माधवराव सुर्यवंशी यांच्या घराजवळचे पाण्याचे कनेक्शन.