तारकेश्वर गडावरील दानपेटी फोडणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळन्यासाठी बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांना भाविकांचे साकडे?

तारकेश्वर गडावरील दानपेटी फोडणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळन्यासाठी बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांना भाविकांचे साकडे?

(सुनिल नजन चिफ ब्युरो/ अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर )___________ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या व अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या महिंदा ता.पाटोदा, जिल्हा बीड येथील तारकेश्वर गडावरील वै.संत नारायण महाराज यांच्या समाधी स्थळा समोरील दानपेटी फोडणाऱ्या संशयीत आरोपींच्या मुसक्या आवळन्यासाठी बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले आहे.दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते.त्या रात्री संत नारायण महाराज यांच्या समाधी स्थळा समोरील दानपेटी अज्ञात व्यक्तींनी फोडून त्यातील सहा लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. या बाबद पाटोदा तालुक्यातील अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 13/2024 कलम 380 प्रमाणे तारकेश्वर गडावरील गाडीचे वाहन चालक अशोक दहिफळे यांनी 7 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या दिवशी गडाच्या पायथ्याशी दानपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसून आली.चोरी झाली त्या रात्री गडावरील येणाऱ्या जाणाऱ्या काही संशयितांच्या मोबाईलची सीडीआर तांत्रिक माहिती घेऊन पोलीसांनी तपासले असता त्यामध्ये चोरीच्या उद्देशाने केलेल्या संभाषणाची ध्वनी फीत पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यामध्ये एका अल्पवयीन संशयित आरोपीने चोरी करणाऱ्या पाच आरोपींची नावे पोलीसांना सांगितली आहेत. पोलीसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले.त्या पैकी एका संशयित आरोपीने तारकेश्वर गडावरील महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.अमळनेर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळे यांनी कसुन तपासून चौकशी केली असता तपासात त्यांना पाच आरोपींनी गुन्हा केला असल्याची कबुली एका अल्पवयीन आरोपीने दिली आहे.त्या संशयित आरोपींमध्ये पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील एका आरोपींचा समावेश आहे.पण पोलिसांनी हलगर्जीपणा करीत काहीच कारवाई न केल्याने गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.सात दिवसात जर पाचही आरोपींना अटक न झाल्यास भाविकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाविकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आठवडा भरातच पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे आश्वासन पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती उद्धवराव वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाकाडे,माउली जरांगे, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल ओव्हळ, अॅडहोकेट वैभवराव आंधळे या भाविकांना दिले आहे. या भागातील विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक सुनिल पाखरे यांनी सांगितले की भाविकांनी दिलेल्या देणगीतूनच गोशाळा व्यवस्था, भाविकांसाठी भोजन व्यवस्था, मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामा साठीच ही देणगी वापरली जाते.दानपेटीतील चोरी गेलेली रक्कम चोरट्यांकडून हस्तगत करुन पोलीसा मार्फत न्यायालयीन आदेशानुसार महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या कडे सुपुर्त करावी.आणि आदिनाथ महाराज शास्त्री यांना पोलीस संरक्षण दिले गेले पाहिजे.अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती ग्रुहमंत्री तथा उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक,उपअधीक्षक यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.