दोन्ही पायांनी अधू असलेल्या पती पत्नीला प्रहार अपंग क्रांतिकडून मदतीचा हात

दोन्ही पायांनी अधू असलेल्या पती पत्नीला प्रहार अपंग क्रांतिकडून मदतीचा हात

कासोदा येथील श्री. हिंमत ब्राम्हणे हे व त्यांच्या पत्नी अपंग आहेत. ते मोलमजुरी करून आपली पोटं भरत असतात. सध्या कोरोनाच्या भयानक परिस्थितीत व लॉकडावूनमुळे सर्वच कामे बंद असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली होती. आपण समाजाचं तसेच संघटनेचे काही देणं लागतो या उद्देशाने श्री. योगेश चौधरी यांनी कासोदा गावातील दानशूर नागरिक तथा व्यापारी वर्गाकडून काही मदत गोळा केली होती. आज त्यांनी प्रत्यक्ष जाऊन श्री.ब्राम्हणे यांना मदतीचा हात दिला. श्री. ब्राह्मणे यांनी समस्त गावकरी, व्यापारी वर्ग तसेच प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष श्री. योगेश चौधरी यांचे आभार मानले आहेत.