आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत” महिलांसाठी रोजगाराच्या संधी” एम. एम. महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत” महिलांसाठी रोजगाराच्या संधी” एम. एम. महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

दि. पाचोरा – कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालयतील विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियाना अंतर्गत दि. 22/03/2024 रोजी प्रा. डॉ. व्ही एन .पतंगे यांचे ” महिलांसाठी रोजगाराच्या संधी “या विषयावर व्याख्यान झाले. प्रा. पतंगे यांनी आपल्या व्याख्यानात महिलांसाठी वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असून यात प्रामुख्याने बचत गटाच्या मार्फत स्वयंरोजगाराच्या संधी वेफर्स बनविणे, शिलाई मशीन, पापड उद्योग, मिरची पूड उद्योग ,मसाला उद्योग, स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार पुरविणाऱ्या वेगवेगळ्या योजना पुरविला जातात. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांनी पुढाकार घेतलेला असून या बँकांच्या योजनांची माहिती जर महिलांना मिळाली तर महिला खऱ्या अर्थाने रोजगारच निर्माण करणार नाही तर इतरांनाही रोजगार पुरवतील असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे महिलांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेतल्यास व आपल्याला मिळालेला वेळ सत्कारणी लावल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे मत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.जे .व्ही. पाटील हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महिलांना जर आत्मनिर्भर बनायचे असेल तर महिलांनी स्वयंरोजगार रोजगार कडे वळले पाहिजे व यातून आपलाच नाही तर आपल्या कुटुंबाचा व समाजाचा विकास होऊ शकतो. नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार निर्माण केला तर इतरांनाही रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतात असे मत व्यक्त केले. व्यासपीठावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एस. इंगळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा वाय .बी.पुरी, प्रा. आर.बी. वळवी , डॉ. माणिक पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे महिला विकास अधिकारी, प्रा.सौ सुवर्णा पाटील, प्रा. संजिदा शेख व प्रा. प्राजक्ता देशमुख विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .क्रांती सोनवणे यांनी केले. तर आभार डॉ. शारदा शिरोळे यांनी मानले.