पाचोऱ्यात माँ साहेब मीनाताई ठाकरे ममता दिन साजरा

पाचोऱ्यात माँ साहेब मीनाताई ठाकरे ममता दिन साजरा

पाचोरा;- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची अर्धांगिनी सावली प्रमाणे साथ देणारी आम्हा तमाम शिवसेनेची माऊली माँ साहेब मीनाताई ठाकरे जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पाचोरा येथे ममता दिन माननीय वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा-भडगाव तथा माननीय दीपक राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन सोहळा शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे दिनांक 06/01/2024 शनिवार रोजी सकाळी 9:00 वाजता संपन्न झाला.
ममता दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका गाव तिथे शाखा याप्रमाणे शाखा उद्घाटन सोहळा शुभारंभ पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड जिल्हा पंचायत गटातील गावापासून करण्यात आला. यात वाणेगाव, निंभोरी खू., निंबोरी बु, निंबोरी तांडा, शेवाळे, वाडी, पिंपरी खु प्र. पा. सातगाँव डोंगरी, वडगाव कडे, शिंदाड, गवहले आदी ठिकाणी शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी राजू काळे, एडवोकेट दीपक पाटील शहर प्रमुख पाचोरा, अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा, संदीप जैन उपजिल्हाधिकारी, नितीन लोहार, सुनील पाटील, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, जयश्री येवले, अनिता पाटील, रवी सोनवणे. अनिश शेख. नाना वाघ, संतोष सर, नंदू सर, शुभम राजपूत आदी उपस्थित होते.