रखरखत्या लालबुंद विस्तवावरून चालत जाऊन हजारो भाविकांनी केली नवसपुर्ती,३७० वी “रहाडयात्रा” हनुमान टाकळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) रखरखत्या लालबुंद विस्तवावरून चालत जाऊन हजारो भाविकांनी केली नवसपुर्ती,३७० वी रहाडयात्रा श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न. संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील रहाड यात्रेसाठी मारुती मंदिरासमोर बारा फुट लांबीचा आणि दोन फूट खोलीपर्यंत एक चर खांदला जातो.त्यामध्ये बोरीच्या झाडांची लाकडे टाकून लालबुंद विस्तव तयार केला जातो.आपल्या नवसाची नवसपुर्ती करण्यासाठी हजारो भाविक भक्त त्या विस्तवावरून अनवाणी पायाने चालत जातात परंतु कोणत्याही भक्तांच्या पायाला कसलीही ईजा होत नाही हेच या यात्रेचे प्रमुख खास वैशिष्ट्ये आहे. शके १५७६ इ.स.न.१६५४ या सालात फाल्गुन महिन्यातील रंगपंचमीच्या दिवशी समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते गाईच्या शेणापासून या मारुतीची स्थापना करण्यात आली.हे हनुमानजी नवसाला पावतात त्या नवसाची नवसपुर्ती करण्यासाठी आषाढ वद्य चतुर्दशी शके १५७७ इ.स.न.१६५५ या दिवशी प्रथम रहाडयात्रा संपन्न झाली. कालची ३७० वी “रहाडयात्रा”ही आषाढ वद्य चतुर्दशी शके १९४७ दिनांक २३ जुलै इ.स.न.२०२५ या तीथीला मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही माहिती तिसगाव येथील समर्थ रामदास स्वामी स्थापीत दिनकर स्वामींच्या मठाचे मठाधिपती महंत प्रकाशबुवा रामदासी यांच्या कडून प्राप्त झाली आहे.याचा उल्लेख प्राचीन काळी लिहिलेल्या ग्रंथात आढळतो.कालची रहाड ही वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव ताठे आणि निव्रुत पाटबंधारे विभागाचे अधिकारी अशोक खेडकर यांच्या हस्ते व समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प.पू. रमेश अप्पा महाराज आणि सचिव तथा पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेदशास्त्रसंपन्न शामराव भालेराव यांच्या मुखातील मंत्रौच्चारात विधिवत पूजा आणि महाआरती करून पेटविण्यात आली.या पेटलेल्या रखरखत्या लालबुंद विस्तवावरून प्रथम चालण्याचा मान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील हनुमान भक्त बाबासाहेब मारुती लोखंडे (वय ५३) यांना देण्यात आला होता.त्यांनी “बजरंग बली की जय”हा गजर करून विस्तवावर चालत जाऊन आपली नवसपुर्ती केली.हा मान त्यांचे पणजोबा नामदेव लोखंडे, आजोबा दगडू लोखंडे, वडील मारूती लोखंडे आणि आता बाबासाहेब लोखंडे यांची चौथी पिढी या चार पिढ्या पासून लोखंडे घराण्याला हा विस्तवावर चालण्या साठीचा पहिला मान देण्यात येत आहे. बाबासाहेब लोखंडे यांच्या मातोश्री मंडुबाई मारुती लोखंडे,भगिनी आणि दाजी दत्तू तरटे हे आवर्जून उपस्थित होते.ही रहाडयात्रा यशस्वी करण्यासाठी साईनाथ बर्डे,बंडू बर्डे,क्रृष्णा काजळे,साईनाथ भगत,गौतम बर्डे,शाम काजळे,प्रविण शिरसाठ,संजय शिरसाट,कानिफनाथ व्यवहारे,प्रविण बलफे,सागर ससे, आदिनाथ ससे, शंतनु रूद्रभटे,किशोर बडबडे, सुरेश बर्डे,उद्धव बर्डे, अक्षय बावणे, ग्रामविकास अधिकारी सुरेंद्र बर्डे,रमेश सुराशे,यांनी विशेष सहकार्य केले.या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी निव्रुत पोलिस अधिकारी सुभाषराव दगडखैर आणि बबनराव दगडखैर यांच्या वतीने पाच क्विंटल शिरा लापशी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.विष्णु गायकवाड,आणि त्यांचे सहकारी यांनी भाविकांना अन्न वाटपासाठी योग्य नियोजन केले होते.तसेच चेकेवाडी येथील भजनी मंडळाने भाविकांसाठी संगीत भजनी संध्या ही भजनी मालिका सादर केली.दरवर्षी रहाडयात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या अन्नदानात दगडखैर परीवाराचा सींहाचा वाटा असतो.या यात्रेसाठी पाथर्डी पोलीसांनी हजेरी न लावल्याने रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या त्या मुळे भाविकांची गैरसोय होऊन दोन तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.हजारो भाविकांनी मारूतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.