तिसगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण राज्यभर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजिवन समाधी सोहळ्याची धामधूम सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथेही चार दिवस काकड आरती,भजन, किर्तन, फुगड्या , हरीपाठ, दींडी मिरवणूक असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.दिनांक २० ते २३ जुलै या कालावधीत हा अखंड हरिनाम सोहळा संपन्न झाला.ह.भ.प.निलेश महाराज वाणी, सुदर्शन महाराज भोसले यांची प्रवचने तर ह.भ.प.सोमेश्वर महाराज गवळी, सुदर्शन महाराज शास्त्री यांची किर्तने झाली. शेवटी ह.भ.प. कल्याण महाराज शिंदे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्या निमित्त संत सावता माळी, विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. निलेश महाराज वाणी यांच्या हस्ते या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.गणेश गारुडकर आणि राजेंद्र भुजबळ यांच्या वतीने काल्याच्या पंगतीद्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिसगावचे जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांनी पन्नास हजार रुपयांची देणगी रोख स्वरूपात दिली.जगलो वाचलो तर पुढील वर्षी याच कार्यक्रमासाठी एक लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. नंदकुमार लोखंडे सर यांनी अत्यंत दूर वरून स्वखर्चाने या मंदिरातील मुर्ती बसविण्यासाठी आणल्या आहेत.यावेळी भाऊसाहेब लोखंडे , रावसाहेब लोखंडे, दिलिप लोखंडे,लहाणू लोखंडे, विठ्ठल लोखंडे, सुरेश काळे, सुनिल रांधवणे,राजेंद्र ससाणे, जयदेव नांगरे,खंडू नांगरे,शरद साखरे सर, डॉ काशिनाथ ससाणे, विक्रम ससाणे, पुरुषोत्तम आठरे,मनोज ससाणे, शंकरराव उंडाळे, राजेंद्र भुजबळ,मनसुर भाई, यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.ह.भ.प.कल्याण महाराज शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची बीदागी न घेता उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तर गावातील सर्व महीला भजनी मंडळाने विशेष सहकार्य केले.मुर्ती दान केल्याबद्दल नंदकुमार लोखंडे सर यांचा गावच्या वतीने भव्यदिव्य असा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.
























