दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत यांना IBN लोकमत चे संपादक श्री मंदार फणसे यांच्या हस्ते प्रदान
काल नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान हॉल येथे संपन्न झालेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यात पाचोरा तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर याना विविध क्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार आय बी एन लोकमत 18 चे संपादक श्री मंदार फणसे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉ महेंद्र देशपांडे सर,मिस युनिव्हर्स व दुबई ज्योति केदारे- शिंदे,अभिनेत्री महेक तसेच अभिनेता प्रवीण चौरे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते श्री अनिल सावंत सर हे वसतिगृह अधीक्षक असून विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे ते चर्मकार समाजासाठी प्रयत्नशील असतात ते गालन बु ग्रामपंचायत मध्ये माजी सदस्य तसेच पत्रकारिता मध्ये अनेक वृत्तपत्र मध्ये त्यांनी कार्य केले असून आज त्यांचे स्वतःचे झटपट लाईव्ह न्युज च्या माध्यमातून ते पत्रकारिता करत आहेत त्यांचा राजकीय, सामाजिक,सहकार,शैक्षणिक क्षेत्रात गाढा अभ्यास असून राष्ट्रीय चर्मकार महासंघ,दादासाहेब गजमल को-ऑप बँक ली पाचोरा,अनुसूचित जाति जमाती प्रदेश समिती इत्यादी पदांवर त्यांनी कार्य केले असून त्यांना कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेक स्तरांतून म्हणजेच राजकिय, सामाजिक,सहकार,शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे