पाचोरा कन्या विद्यालय 12 वी चा 99 टक्के निकाल
पाचोरा
येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली पाचोरा शाळेतील कनिष्ठ विद्यालय विभाग (12 वी ) कला शाखेचा बारावीचा निकाल 98.76% लागला आहे. परीक्षेस 81 विध्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या, पैकी 80 विध्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
कन्या विद्यालयात गुणानुक्रमे अव्वल ठरलेल्या विद्यार्थिनी पुढील प्रमाणे –
प्रथम – गायत्री दिपनारायण महंतो (74.33%)
द्वितीय- नंदिनी मच्छिन्द्र पाटील (74.00%)
तृतीय- साक्षी बळीराम मोरे (73.83%)
चतुर्थ – कविता राजेंद्र साळुंखे (73.67%)
संस्थेचे अध्यक्ष धैर्यशीलराजे पवार, सेक्रेटरी सौ. रुपालीताई जाधव, प्राचार्य संजय पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.