श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे अमृत भारत स्टेशन योजना पाचोरा आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे कलादालन मध्ये आयोजित ( ABSS) अमृत भारत स्टेशन योजना पाचोरा यांच्यामार्फत चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण होणार असून यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण मांडता यावे आपले स्टेशन कसे असावे, अमृत भारत योजना, अशा विविध विषयांवर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली या नावीन्यपूर्ण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला या स्पर्धेसाठी मुख्य कल्याण निरीक्षक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय भुसावळ च्या प्रमुख दीपा स्वामी यांनी विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपलं रेल्वे स्थानक कसे असावे ,अमृत भारत योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाची जबाबदारी माझ्यावर असून पाचोरा शहरातील नागरिकांकडूनच मी या सर्व गोष्टी आत्मसात करत आहे त्यासाठी हा चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपले मत व कल्पकता मांडायचे आहे. रेल्वेचे नूतनीकरणासाठी सर्वच घटकांचा समावेश करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, कला शिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील ,ज्योती ठाकरे, रुपेश पाटील , रवींद्र जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ शिक्षक रुपेश पाटील यांनी मानले