चोपडा महाविद्यालयात ‘पाच दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘पाच दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान युवतीसभेअंतर्गत ‘मिशन साहसी अभियान’ राबवण्यात आले. या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ०५ दिवस रोज ०२ तास स्वरक्षणार्थ कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. या अभियानाचा समारोप सोहळा आज दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी या अभियानास भेट देवून विद्यार्थिनीशी सुसंवाद साधला व कार्यक्रमाचा आढावा घेतला. संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेछा दिल्या.
या कार्यकमाच्या प्रमुख वक्ते म्हणून चोपडा शहरातील सुप्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ.सौ. प्राजक्ता स्नेहलकुमार भामरे तसेच कृषि कन्या व विविध पुरस्कार प्राप्त महिला गृहउद्योजक सौ.कविता वाणी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस. कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ, सौ. मायाताई शिंदे, प्रशिक्षक आत्माराम बावीस्कर व सहकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना युवती सभा प्रमुख डॉ.सौ प्रिती रावतोळे म्हणाल्या की, वर्तमान पत्रातून व प्रसार माध्यमातून जगात घडणाऱ्या अनुचित प्रकाराच्या घटना ऐकायला व वाचनात येतात.अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुलीना स्वरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. हा दृष्टिकोण ठेवूनच मुलीचे स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ व्हाव्या त्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी तज्ञ प्रशिक्षकांकडून जूडो कराटेचे प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले आहे’.यावेळी वक्त्याचा परिचय सौ. क्रांती क्षीरसागर यांनी करून दिला.
यावेळी डॉ.सौ.प्राजक्ता स्नेहलकुमार भामरे यांनी ‘स्त्री आरोग्य विषयक जागृती व समस्या संदर्भात उपाययोजना’ याविषयी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.यावेळी मुलींना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक मुलीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्रीने फक्त चुल व मुलाकडेच लक्ष न देता आपल्या आरोग्याचे महत्त्व आपण स्वतः समजून इतरांना देखील समजून सांगितले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित व्यायाम देखील केला पाहिजे.
याप्रसंगी प्रमुख वक्त्या सौ.कविता वाणी यांनी विद्यार्थिनींना ‘स्वयंरोजगार’ याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण अनेक गोष्टींची नवनिर्मिती करू शकतो. स्ञी ही एक नारीशक्ती आहे. ती सर्वगुण संपन्न असते. त्यामुळे स्ञीने अनेक नवीन कल्पना आपल्या डोक्यामध्ये ठेवून त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यात यश प्राप्त केले पाहिजे.
या कार्यक्रमांमध्ये गायत्री मनोज धनगर हिने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री.एन.एस.कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यासाठी आजच्या मुलींनी ही स्वावलंबी व्हायला पाहिजे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यायला पाहिजे व आपली सुरक्षा आपण स्वतः केली पाहिजे.
या ‘पाच दिवशीय मिशन साहसी कार्यशाळेसाठी’ विद्यार्थिनींना वैविध्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक आत्माराम बाविस्कर यांनी मेहनत घेतली व विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास रजिस्ट्रार डी.एम.पाटील, डॉ. एल.बी. पटले. डॉ.सी.आर.देवरे, डॉ.के.एस.भावसार आदि उपस्थित होते.
या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सुनीता पाटील यांनी केले तर आभार डॉ.सौ संगीता पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी पूजा पुनासे, आशा शिंदे सौ.रजनी जयस्वाल, सौ.अनीता सांगोरे, सौ. हर्षा देवरे, शाहीन पठाण, अश्विनी जोशी, पल्लवी कासार, सौ.एच.ए.सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. या अभियानात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.