सिनियर सिटीझन जनकल्याण संस्था आयोजित वृक्षारोपण संपन्न

सिनियर सिटीझन जनकल्याण संस्था आयोजित वृक्षारोपण संपन्न

आज दिनांक 31/07/21 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर भडगाव येथे सिनियर सिटीझन जनकल्याण संस्था यांच्या कडून आणि डॉ.मधुकर सोनवणे यांची सुकन्या प्राजक्ता सोनवणे (इंजिनियर) यांनी प्रायोजित केलेल्या वृक्षारोपण व त्यानिमित्त समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.भडगाव शहरात विविध संस्था आणि शाळा, महाविद्यालय परिसरात प्रजक्ताताई यांनी वृक्षारोपण केले असून नागरिकांमध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.सदर कार्यक्रमासाठी पाचोरा-भडगाव नगरीचे लोकप्रिय आमदार आप्पासाहेब किशोर पाटील उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब श्री. अनिल पवार यांनी संस्थेविषयीच्या कामाचा उपस्थितांन समोर आढावा घेतला.आमदार साहेब यांनी सिनियर सिटीझन संस्थेचे कौतुक केले आणि संस्थेला लवकरात लवकर जागेची उपलब्धता करून एक हॉल बांधून देण्याचे अस्वासन दिले आहे.ही आनंदाची बाब आहे.साठीसचिव श्री.चेंडूराम पवार अप्पा,उपाध्यक्ष साहेबराव, महाजन,वंजारी साहेब यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन केले.या प्रसंगी आमदार साहेब यांनी संस्थेची उत्कृष्ट कामाबद्दल प्रशंसा केली.या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,युवराज पाटील,डॉ.मधुकर सोनवणे,माजी नगरसेवक जगन्नाथ भोई,संतोष महाजन,नत्थु अहिरे.शांताराम भोई,गुलाबराव जाधव,मोतीलाल नरवाडे, दिलीप सहस्त्रबुद्धे, एकनाथ केदार,एस एम पाटील,व्ही जी चौधरी,योगेश शिंपी सर उपस्थिती देऊन सहकार्य केले. तसेच श्री शांताराम आप्पा भोई व सर्व संचालक मंडळाने सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले ..