जर काम होत नाही तर आश्या ठेकेदाराला काम का देते न.पा प्रशासन..?

जर काम होत नाही तर आश्या ठेकेदाराला काम का देते न.पा प्रशासन..?

पाचोरा ( प्रतिनिधी )
पाचोरा कृष्णापुरी भागातील गुरुदत्त नगर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असता एम.एस.पी. कन्ट्रक्शनला काम दिल्यामुळे येथील नागरिक खूप आनंदी झाले होते पण काम चालू झाले असता.

येथील दोन रस्ते वेगळ्या ठेकेदाराला दिले गेले आहेत हे लक्षात आला वर नैराश्य झाले कारण ज्या गतीने एम.एस.पी. च काम चालू होतं त्यापेक्षाही लाख पट्टी संथगतीने काम चालू झाले आणि आजही तीन महिने झाले असून काम पूर्ण नाही झालं आहे.

या भागातील नागरिक मध्ये बोले जात आहे की मा. आमदार साहेब वाघाच्या गतीने काम मंजुर करून काम देतात पण ते काम कासवाच्या गतीनं चालू असत यावर स्वतः लक्ष देऊन त्या कामाचा आढावा घेत नाहीत.

जर काम तात्काळ सुरू नाही झाले तर आम्हीही खळी सव खर्चाने उचलून न.पा. समोर टाकून न.पा. चा निषेध करू व याला जबाबदार प्रशासन असणार अशी माहिती जनलक्ष्य कडे बोलत असताना दिली.

त्याप्रमाणे मुख्य हायवेला जोडला जाणार हा रस्ता मुरूम टाकून सोडून दिला आहे पुढे पावसाळ्यात ह्या मुरूमचा काही उपयोग नाही आणि नागरिकांना यांच्या पण त्रास होणार आहे त्याकरता न.पा. आताच लक्ष देऊन काम करावं हे बोले जात आहे.