नांद्रा येथे”माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रम”

नांद्रा येथे”माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रम”

नांद्रा(ता.पाचोरा) येथील महादेव मंदिरात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त दि.१सप्टेंबर ते ३०नोव्हेंबर या दरम्यान पाचोरा कृषी विभागाच्या वतीने”माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी,”चा कार्यक्रम पार पडला .यात महाराष्ट्र शासन कृषी विभागाव व पदमालय फार्मर कंपनी शिवणी ता.भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी – सरकारी भागीदारी उपक्रम २०२२-२०२३अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजना रब्बी हंगामात २०२२-२०२३अंतर्गत प्रमाणित बियाणे वाटप करण्यात आले.लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर लशीकरण व घ्यायव्याची काळजी या विषयी नांद्रा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ निलेश बारी यांनी जनावरांना तीन दिवस उपचार केल्यास जनावरांना लसीकरण महत्वाचे आहे.लम्पी हा आजार फाॅरेष्ट मधील जनावरांना सुद्धा लागण झाली आहे.या बाबतीत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी आर.एन.जाधव मंडळ कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव, कृषी पर्यवेक्षक आर.बी.चौधरी, आत्मा चे सचिन भैरव, कृषी सहायक चेतन बागुल ,आत्मनिर्भर कृषी अध्यक्ष विशाल नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे विशाल नेवे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी व निंबोळी अंर्क वाटप करण्यात आले.यावेळी कृषी श्रद्धा शेतकरी गटाचे अध्यक्ष मनोज पाटील, सचिव संजय पाटील , माजी सरपंच सुभाष तावडे, पत्रकार राजेंद्र पाटील,साहेबराव तावडे, राकेश साळवे,भिमराव गजमल पाटील, शिवाजी तावडे,जिभु सातपुते, प्रकाश पाटील, किशोर पाटील, शांताराम सुर्यवंशी ,संजय राघो पाटील यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.