विभागीय क्रिकेट स्पर्धेत न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडीयम स्कूल चे सलग 2वर्ष यश

विभागीय क्रिकेट स्पर्धेत न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडीयम स्कूल चे सलग 2वर्ष यश

 

 

नुकत्याच धुळे येथे झालेल्या आंतरशालेय विभागीय क्रिकेट स्पर्धेत पाचोरा येथील न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडीयम स्कूल ने नाशिक मनपा या संघाला नमवत जळगाव विभागाकडे विजेतेपद खेचून आणले,यात एकूण धुळे,जळगाव,नाशिक,नंदुरबार यांचा समावेश होता,झालेल्या उपांत्य व अंतिम सामन्यात कर्णधार सायली पाटील च्या अष्टपैलू खेळीने विजयश्री ओढून आणली सायलीने अंतिम सामन्यात 44 धावा करत 3 गडी बाद केले ,तिला अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले ,मिळालेल्या विजयात शाळेचे प्राचार्य श्री.डी. पी. देवरे सर तसेच क्रीडाशिक्षक अभिषेक भावसार व पंकज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले..सदर टीम चे बुऱ्हानी एज्युकेशन सोसायटी ने कौतुक केले…