श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे भारतीय सैनिक श्री.राकेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी

🌈पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज 🇮🇳 हर घर तिरंगा 🇮🇳 अभियानांतर्गत भारतीय सैनिक श्री.राकेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आर्मीमधील शिस्त खूप महत्वाची असते आणि हीच शिस्त माणसाला घडवते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून त्यांना प्रेरित केले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्याचे उगवते तारे म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते असे मत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच स.11 वा.सामूहिक राष्ट्रगीत घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल वाघ सर यांनी तर आभार श्री.भूषण पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.