Home पाचोरा गुरुकुल इंटरनॅटनल स्कूल, पाचोरा येथे क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

गुरुकुल इंटरनॅटनल स्कूल, पाचोरा येथे क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

गुरुकुल इंटरनॅटनल स्कूल, पाचोरा येथे क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व शारीरिक विकासासाठी गुरुकुल इंटरनॅशनल पाचोरा येथे दर वर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते. दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या क्रीडा सप्ताहात नर्सरी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. क्रीडा स्पर्धांमध्ये रनिंग ( धावणे), बकेट बॉल, लांब उडी, कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, बुद्धीबळ, कॅरम, बॅडमिंटन इत्यादी इनडोअर व आऊटडोअर स्पोर्ट्सचा समावेश होता.

प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी , मेडल्स देऊन शाळेचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित कार्यात आले.तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडू विद्यार्थ्याला २ मार्च ते काल ५ मार्च पर्यंत वर्ग शिक्षकांच्या हस्ते प्रमाण पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनाणी सर व उपस्थित मान्यवर यांनी श्री शिव प्रतिमेचे पूजन व बाला फेक करून केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ, अमेना बोहरा व सौ. क्षितिजा हटकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक कु. साक्षी पवार मॅडम व श्री निरंजन राठोड सर यांचे मार्ग दर्शन लाभले.

Don`t copy text!