महिला बचत गट सामाजिक आर्थिक कौटुंबिक व्यवहारिक प्रगती करण्याचे माध्यम आहे… विद्याधर गायकवाड

*महिला बचत गट सामाजिक आर्थिक कौटुंबिक व्यवहारिक प्रगती करण्याचे माध्यम आहे… विद्याधर गायकवाड*
बचत गट ही लोक चळवळ असून फक्त आर्थिक व्यवहाराशी संबंधित नसून महिला बचत गटात सहभागी होईल त्या महिलेचा सामाजिक आर्थिक कौटुंबिक व्यवहारिक प्रगती करण्याचे माध्यम असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना असून या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे.असे प्रतिपादन यशदाचे मास्टर ट्रेनर विद्याधर गायकवाड यांनी केले.
महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गट शेणोली सावली ग्रामसंघ व सकाळ समूह तनिष्का ग्रुप यांच्या वतीने शेनोली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचा सत्कार समारंभ आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये विद्याधर गायकवाड बोलत होते.
यावेळी शेणोली ग्रामपंचायत सरपंच जयवंत उर्फ विक्रम कणसे, उपसरपंच सौ संगीता अविनाश माळी. शेनोली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी एस ए पाटील, कराड पंचायत समितीचे बचत गट विभाग समन्वयक सुशांत तोडकर, सकाळ समूहाचे तनिष्का प्रमुख लक्ष्मण चव्हाण, ग्रामपंचायत माजी सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाजपाचे कराड दक्षिण उपाध्यक्ष प्रकाश बापू कणसे, ग्रामपंचायत सदस्य नारायण भीमराव शिंगाडे, सौ. आशा संपत गायकवाड, संतोष भाऊसो कणसे, मंगल हणमंत कणसे, , रेश्मा शरद सूर्यवंशी, शोभाताई बाबासो सूर्यवंशी, रिजवान फारुख मुल्ला, सुधीर हिंदुराव बनसोडे, विजय कुमार निवृत्ती कुंभार सुवर्णा राजेंद्र पाटील, संगीता कणसे, CRP भाग्यश्री कणसे, सीआरपी सोनाली साळुंखे, आर्थिक साक्षरता प्रचारक सौ. पूजा वाघमारे आदी सदस्य, गावातील विविध बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी शेंणोली गावचे माजी सरपंच नारायण शिंगाडे, बचत गट प्रभाग समन्वयक सुशांत तोडकर, चिन्मय वराडकर, तनिष्का विभाग प्रमुख लक्ष्मण चव्हाण, गोंदी च्या CRP सौ शितल अविनाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून उपस्थितांचे स्वागत शेनोली सावली ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. सुनंदा अरुण कणसे यांनी केले. या प्रास्ताविक व सूत्रसंचालन बँक सखी सौ सोनाली बनसोडे यांनी केले तर आभार सौ. सुनंदा अरुण कणसे यांनी मानले