भुसावळ -मुंबई पॅसेंजर सुरू करुन सामन्य टिकीट सुरू करा : कॉंग्रेस ची रेल्वे मंत्र्याकडे मागणी

भुसावळ -मुंबई पॅसेंजर सुरू करुन सामन्य टिकीट सुरू करा : कॉंग्रेस ची रेल्वे मंत्र्याकडे मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना महामारी चे कारण देत काही रेल्वे सह सामान्य टिकीट बंद आहेत अख्खा भारत सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने तात्काळ पॅसेंजर सह सामान्य टिकीट सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेस ने दिला आहे.

रेल्वे प्रशासनाने कोरोना चा अटकाव झाला तरी देखील बहुतांश गाड्या सह सामान्य टिकीट बंद ठेवले आहे. यातच मेमु रेल्वे सुरू करु अशा वल्गना करणाऱ्या केंद्र सरकारच्या रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे तात्काळ सर्वसामान्य जनतेची भुसावळ – मुंबई पॅसेंजर तात्काळ सुरू करुन सामान्य टिकीट सुरू करावे अशी मागणी चे निवेदन रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याकडे *कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
सदर निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना पाठवले असुन निवेदनात पुढे म्हटले आहे की अनेक दिवसांपासून अप-डाउन करणारे प्रवासी आणि सर्व सामान्य नागरिक सामान्य तिकीट व महीन्याची पास बंद असल्याने हैराण झाले आहेत. त्यातच एसटी बस बंद असल्याने गोरगरीब जनतेला खाजगी बस चा प्रवास न परवडणारा आहे. त्यामुळे भुसावळ – मुंबई पॅसेंजर तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा रेल्वे स्थानक बाहेर कॉंग्रेस कडुन जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी म्हटले असुन भाजपा प्रणित मोदी सरकार आपल्या नफेखोरी वृत्तीमुळे गोरगरीब व सर्व सामान्य जनतेचा विसर पडला आहे. अदानी समूहाच्या मालगाड्या सरकार च्या रेल्वे लाईन वर जास्त प्रमाणात धावत आहेत त्यामुळे रेल्वे च्या बहुतांश गाड्या अद्याप ही बंद आहेत. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाखो च्या संख्येने सभा घेत आहेत मग रेल्वेतच कोरोना कसा असा सवाल श्री सोमवंशी यांनी व्यक्त केला आहे