Home महाराष्ट्र सोयगावमध्ये पाणीपुरवठा मोटारीत साप आढळला; कर्मचाऱ्यांची सतर्कता

सोयगावमध्ये पाणीपुरवठा मोटारीत साप आढळला; कर्मचाऱ्यांची सतर्कता

सोयगावमध्ये पाणीपुरवठा मोटारीत साप आढळला; कर्मचाऱ्यांची सतर्कता

 

 

सोयगाव प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले

 

सोयगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या मोटारीत बिघाड झाल्याने नगर पंचायत कर्मचारी दुरुस्तीसाठी धरण परिसरात गेले असता अनपेक्षित घटना घडली. मोटार बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये साप आढळून आला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही घाईगडबड न करता सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याला जिवंत अवस्थेत पाण्यात सोडून दिले.

दरम्यान, काल दिवसभर वीजपुरवठ्यात अडचण असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. आज मोटार सुरू करण्यासाठी कर्मचारी गेले असता ही घटना घडली. अशा परिस्थितीतही कर्मचारी जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले.यावेळी नगरपंच्यात पाणी पुरवठा कर्मचारी सुरेश महाले व बाकी कर्मचारी हजर होते.

कोट.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे पाण्याचा योग्य साठा करून तो जपून वापरावा. तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची जाणीवही नागरिकांनी ठेवावी.

नगरसेवक संतोष बोडखे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

 

मोटार मध्ये साप काढतांना कर्मचारी सुरेश महाले फोटो, दत्तात्रय काटोले

Don`t copy text!