वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

 

जळगाव, दिनांक 23 (प्रतिनिधी ) : शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले.

 

आज जळगावातील एका हॉटेलमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संचालक राजेंद्र दर्डा आणि मल्टीमीडिया फिचर्सचे सीईओ सुशील नवाल यांची उपस्थिती होती.

 

वैशालीताई सुर्यवंशी यांनी सुरेशदादा जैन यांची भेट घेत आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतला. याप्रसंगी सुरेशदादांनी त्यांचे स्नेही स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत, ताईंच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.