मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने पाचोरा भडगाव तालुक्यात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी आ.किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास योजने अंतर्गत प्रथमच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या सहकार्याने सहाय्यक साहित्य वाटप

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने पाचोरा भडगाव तालुक्यात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी आ.किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास योजने अंतर्गत प्रथमच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या सहकार्याने सहाय्यक साहित्य वाटप करण्यासाठी पाचोरा व भडगाव तालुक्यात दि.१३ व १४ ऑगस्ट रोजी प्रथमच प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा व भडगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देणेसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत रू १० लक्ष मंजुर केले असून सदर मंजुर निधीतून पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना सर्व प्रकाराचे सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ.किशोर अप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,यासाहित्य वाटप कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सर्व प्रकारातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वागीण शारिरीक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने विशेष पुनर्वसन तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुविद्य असे दर्जेदार, गुणवत्ता पुरक सहाय्यक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरुन दिव्यांग व्यक्तींच्या व्याधीचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास तसेच त्यांचे दैनंदिन चलन वलन सोईचे होण्यासाठी मोलाची मदत होऊन त्यांच्यातील न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने अशा प्रकाराचे दिव्यांग साहित्य वाटपाचे शिबीर प्रथमच मतदारसंघात होत असल्याने दिव्यांग बांधवात आनंद निर्माण झाला आहे.पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी या शिबीरात दाखल होऊन लाभ घेण्याचे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर साहित्य उपलब्ध करून देण्यापुर्वी पात्र लाभार्थ्याची तज्ञांकडून मुल्यमापन व तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालय जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या वतीने भडगाव येथे शुक्रवार दि १३ ऑगष्ट रोजी शिवसेना कार्यालयात सकाळी १० वाजता तसेच शनिवार दि. १४ ऑगष्ट रोजी पाचोरा येथील भडगाव रोड वरील महालपुरे मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
सदर मुल्यमापन व तपासणी शिबिरात दिव्यांग प्रकारानुसार सहाय्यक साहित्य शिफारस केले जाणार आहे. दरम्यान पात्र लाभार्थ्यांनी सोबतअपंग प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्डाची प्रत, ३ पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे.
या शिबिरात अस्थिव्यंग बांधवांसाठी तिनचाकी सायकल, व्हिल चेयर, कुबड्या, वॉकर, एलबो स्टिक, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, आवश्यक ते सर्व कृत्रीम अवयव व सहाय्यक उपकरणे कर्णबधीर बांधवांसाठी डिजिटल कर्णयंत्र (जर्मन कंपनीचे) आवश्यकते नुसार इयर मोल्ड
अंध बांधवांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अंध काठी, साधी अंध काठी, ब्रेल साहित्य मतीमंद वा गतीमंद बांधवांसाठी एमआर किट सेरेब्रल पाल्सी- एडीएल किट, सिटींग कॉर्नर चेयर, सि.पी चेयर इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त लाभार्थ्याच्या आवश्यकतेनुसार सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.