श्री गो.से. हायस्कूल, पाचोरा येथील उपशिक्षक श्री. बी. एस. पाटील नेट परीक्षा उत्तीर्ण

श्री गो.से. हायस्कूल, पाचोरा येथील उपशिक्षक श्री. बी. एस. पाटील नेट परीक्षा उत्तीर्ण

पाचोरा ( प्रतिनिधी)
श्री गो.से. हायस्कूल, पाचोरा येथील उपशिक्षक श्री. बी. एस. पाटील यांनी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे डिसेंबर 2023 मध्ये घेतली गेलेली नेट परीक्षा मराठी विषयात उत्तीर्ण केली आहे. यापूर्वी 2021 मध्ये ते
हिंदी विषयातून सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी चार विषयातून एम. ए. ची पदवी प्राप्त केली असून, ते एम. एड्. देखील आहेत. तसेच 2020 मध्ये त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून पेट परीक्षा उत्तीर्ण होऊन संशोधनाला देखील सुरुवात केली आहे. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष भाऊसो. दिलीप भाऊ वाघ, संस्थेचे उपाध्यक्ष नानासो.व्ही.टी.जोशी, संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ, श्री गो.से. हायस्कूल चे शालेय समितीचे अध्यक्ष दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग शालेय समितीचे अध्यक्ष आण्‍णासो. वासुदेव महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रमिला वाघ, उप मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील, पर्यवेक्षक श्री ए. बी.अहिरे, पर्यवेक्षक सौ. आरती गोहिल, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. बी. एस. पाटील यांचे कौतुक करून सत्कार केला आहे.