महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 2 ते 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 2 ते 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर

जळगाव,   महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गजानन खराटे, प्रा. डॉ. निलीमा सरप, ज्योतीराम चव्हाण हे दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी, 2023 या कालावधीमध्ये जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-
दिनांक 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सांय 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन. दिनांक 3 फेब्रुवारी, 2023 सकाळी 10.30 ते 12.30 जळगाव जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी (सर्व) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व समाज कल्याण अधिकारी यांचेसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता लाडशाखीय वाणी, लाडवंजारी व काथार कंठाहार वाणी या जातीसमुहासोबत बैठक व चर्चा, दुपारी 3.00 ते 5.00 सुनावणीच्या अनुषंगाने क्षेत्रपाहणी व मुक्काम.
दिनांक 4 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.30 ते 1.30 काही जाती समुहांची/ व्यक्तींची व्यावसायिक/निवासी स्थळ व क्षेत्र पाहणी.
00000