वाडे येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे शिबीर उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

वाडे येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे शिबीर उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

पाचोरा प्रतिनिधी : डॉ.भुषण मगर- पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात गावातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला .अशोक बापू यांना डॉ.भूषण मगर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्राथमिक शाळेत डॉ.भूषण मगर-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रसंगी डॉ.भूषणदादा मगर यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ.भूषणदादा मगर, मा.अमोलभाऊ शिंदे,माजी सैनिक समाधान पाटील,सरपंच,उपसरपंच, पोलिस पाटील,माजी सैनिक,आशासेविका, विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दिली..