पाचोरा पोलिसांची 45 तासांत कामगिरी; हरवलेला मोबाईल शोधून मूळ मालकाच्या ताब्यात
पाचोरा (प्रतिनिधी) : दि. 30/04/2026 रोजी गणेश प्रशांत पाटील (रा. सिंगाड, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांचा मोबाईल जामनेर रोडवरील विक्रेनर हॉटेल, पाचोरा येथे हरवला होता. याबाबत त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
या प्रकरणाची दखल घेत मा. पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश पाटील व गणेश कुंवर यांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून अवघ्या 45 तासांत हरवलेला मोबाईल शोधण्यात यश मिळवले.
सदर मोबाईल मूळ मालकाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला असून, या जलद आणि कार्यक्षम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी पाचोरा पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हरवलेला मोबाईल परत मिळू शकला.























