तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100% निकालाची परंपरा कायम…..!
पाचोरा- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या *इ.12 वीच्या* परीक्षेत *तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून देदीप्यमान यश संपादन केले आहे. *कु.अद्वैत प्रवीण पाटील याने 87.67%* गुण मिळवून महाविद्यालयात *प्रथम*, *कु.पार्थ संतोष पाटील* याने *86.67%* गुण मिळवून *द्वितीय* तर *कु.क्रिश नंदकिशोर जडे* याने *83.00%* *तृतीय* क्रमांक पटकावला आहे.
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.