चिंचोले परिवार सामनेरकर पुस्तिकेचे अनावरण आणि स्नेहसंमेलन संपन्न

चिंचोले परिवार सामनेरकर पुस्तिकेचे अनावरण आणि स्नेहसंमेलन संपन्न

चिंचोले परिवार सामनेरकर यांचं प्रथम स्नेह संमेलन, आणि आम्ही चिंचोले सामनेरकर या पुस्तिकेचे अनावरण कुलस्वामिनी पेडकाई च्या पायथ्याशी असलेल्या हॉल मध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण वाणी पुणे हे होते .प्रमुख अतिथी राजेंद्र पाचपुते(धुळे),गजानन मालपुरे जळगाव हे होते .या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सन्मान व 56 भोग कार्यक्रम देखील पार पडला. किरण चिंचोले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चिंचोले परिवाराच्या सहकार्याने श्री. किरण शांताराम चिंचोले, श्री. अशोक कृपाराम चिंचोले आणि योगेश दशरथ चिंचोले यानी आयोजन करून संपन्न केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक चिंचोले यांनी केले. प्रा राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थी व पालकांना करिअर निवडताना घ्यावयाची काळजी व कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च करिअर करून परिवाराची मान उंचवावी अशा प्रकारचे आवाहन केले. चिंचोले परिवाराच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी घेतला. या कार्यक्रमात गजानन मालपुरे व राजेंद्र पाचपुते यांनी चिंचोले परिवाराच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. प्रमोद चिंचोले ,विकास चिंचोले स्वप्निल चिंचोले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रियंका चिंचोले, व चैताली चिंचोले यांनी केले. आभार प्रदर्शन किरण चिंचोले यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिंचोले परिवारातील सदस्यांनी मेहनत घेतली.