रोटरी प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा भडगाव रोटरी क्लबला भेट

रोटरी प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा भडगाव रोटरी क्लबला भेट

पाचोरा : प्रतिनिधी
रोटरी प्रांत 3030 च्या प्रांतपाल ( District Governor) रो. आशा वेणूगोपाल यांनी दिनांक 18 मार्च रोजी रोटरी क्लब पाचोरा भडगाव ला भेट दिली. या भेटीत त्यांनी रोटरी क्लबच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला व सदस्यांना मार्गदर्शन केले.

प्रांतपाल रो. आशा वेणूगोपाल यांनी 18 रोजी सकाळी तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील हेमाडपंथी स्वयंभू श्री हरिहरेश्वर मंदिराला भेट देऊन पूजा अर्चना केली. तेथील मतिमंद निवासी विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केली. त्यानंतर पाचोरा येथील स्वप्नशिल्प रेसिडेन्सी बँक्वेट हॉल येथे त्यांनी रोटरी क्लब सदस्यांच्या बैठकीला उपस्थिती दिली. याप्रसंगी अशा वेणूगोपाल यांचे समवेत क्लबचे अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे व सेक्रेटरी डॉ. मुकेश तेली मंचावर उपस्थित होते. या भेटीत रोटरी क्लब पाचोरा भडगावच्या सण 2023 -24 च्या कामकाजाचा व उपक्रमांचा आढावा घेतला आणि रोटरी पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी वेणुगोपाल यांनी रोटरी क्लबचे सन 2024-25 या वर्षाचे निर्वाचित अध्यक्ष रो. डॉ. पवनसिंग पाटील व निर्वाचित सेक्रेटरी रो. शिवाजी शिंदे यांना सन्मानित केले. ज्येष्ठ रोटरी सदस्य भरत सिनकर यांनी रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत “पॉल हॅरीस सदस्य” म्हणून देणगी दिल्याबद्दल प्रांतपाल यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लबच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत पुढील वर्षाच्या उपक्रमांसाठी दिशादर्शक मार्गदर्शन केले.

पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. मुकेश तेली यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर केला. क्लबचे अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रो.चंद्रकांत शेठ लोढाया , रो.भरत सिनकर, रो. गोरख महाजन, रो. रुपेश शिंदे, रो. राजेश मोर, रो. निलेश कोटेचा, रो. सुयोग जैन यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी रो. रोहन पाटील, सौ. ज्योती शिंदे, सौ. चारुशीला तेली, डॉ. प्रतिभा तेली, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. घनश्याम चौधरी, रो. डॉ. किशोर पाटील उपस्थित होते.शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुयोग जैन यांनी आभार प्रकटन केले.