नेवासा तालुक्याचे प्रश्न कोणी विधानसभेत मांडले हे मला कधीच दिसलें नाही, पुर्वीच्या आमदारांना भेटायला सात पडदे ओलांडून पुढे जावे लागत होते, आता सात पडद्याचे राजकारण संपलेले आहे : आमदार विठ्ठलराव लंघे

नेवासा तालुक्याचे प्रश्न कोणी विधानसभेत मांडले हे मला कधीच दिसलें नाही, पुर्वीच्या आमदारांना भेटायला सात पडदे ओलांडून पुढे जावे लागत होते, आता सात पडद्याचे राजकारण संपलेले आहे : आमदार विठ्ठलराव लंघे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नेवासा तालुक्याचे प्रश्न कोणी विधानसभेत मांडले हे मला कधीच दिसलें नाही, पुर्वीच्या आमदारांना भेटायला सात पडदे ओलांडून पुढे जावे लागत होते. मी आमदार झाल्या मुळे आता सात पडद्याचे राजकारण संपलेले आहे.असे उदगार नेवासा तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी काढले.ते आपली मायभूमी शिरसगाव येथे आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी भव्य दिव्य सत्काराला उत्तर देताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी नगरचे शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरचे भाजपचे माजी खासदार सुजयदादा विखेपाटील हे होते.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांचे नाव न घेता त्यांच्या वर खरमरीत टीका केली. ते पुढे म्हणाले की मागे वळून पहा नेवासा तालुक्यात नुसत्या आमदारक्या भोगणारांनी काहीही विकास कामे केली नाही.आपल्या नेवासा तालुक्याचे प्रश्न कोणी विधानसभेत मांडले हे मला कधीच दिसलें नाही.आज मी जरी आमदार झालो असलो तरी मला कधीही केव्हाही कुठेही फोन करा हा बंधू तुमच्या साठी सदैव खंबीरपणे उभा आहे.आता काळजी करू नका या तालुक्यात जी दहशत आणि दडपशाही होती ती संपलेली आहे.आता कोणालाही त्रास झाला आणि झोपलेले पुन्हा एकदा उठून आले तर मी आता आमदार म्हणून उभा आहे. झोपेतून जागे झालेले तुमचं काहीच करू शकत नाही.शनिशिंगणापूर हे जागतिक दर्जाचे देवस्थान आहे.तेथे ही बोगस ॲप घोटाळा झाला आहे.सर्वांनी उपोषणाद्वारे आवाज उठवला आहे.याचा गाॅडफादर कोण आहे हे आता तपासून पहावे लागणार आहे.आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रथम हा प्रश्न मांडला जाईल असे आश्वासन आमदार लंघे साहेब यांनी दिले.तसेच नेवासा फाट्याजवळील गणपती मंदिरा जवळ आपले नविन कार्यालय सुरू झाले आहे.तेथे येऊन आपले प्रश्न आणि अडीअडचणी सांगा.असे लंघे पाटील यांनी सांगितले.माजी खासदार सुजयदादा विखे पाटील म्हणाले की मी तुम्हाला आमदार लंघे पाटील यांची खात्री देतो की हा माणूस कधीच बदलणार नाही.या माणसांनी आपल्या पदाचा त्याग करून दोन तीन माणसांना आमदार केले होते. तो स्वतः आमदार झाल्यावर काय बदलणार,आता बदलायच वय गेल आहे.असा टोलाही त्यांनी लगावला.खासदार संदिपान भुमरे पाटील म्हणाले की मी अनेक ठिकाणी वाढदिवस पाहिले पण असा वाढदिवस कधीच पाहिला नाही. माजी आमदार स्व.वकिलराव लंघे पाटील यांच्या नंतर गेल्या ४२ वर्षाच्या घनघोर तपश्चर्ये नंतर चांगला हुशार आणि कर्तबगार आमदार आपल्या तालुक्याला मिळाला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सारखे उदार व्यक्तीमत्व लंघे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे तुमच्या तालुक्याचा विकास आता पाठीमागे राहणार नाही असे खासदार संदिपान भुमरे पाटील यांनी आवर्जून सांगितले.तसेच माजी आमदारावर टीका करताना मंत्री पदासाठी कोणी खोके दिले होते हे तुम्ही तपासुन पहा. तेच आमच्यावर खोके आणि बोके म्हणून टीका करीत होते.या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी खासदार संदिपान भुमरे पाटील आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील हे एकाच मोटार सायकल वर बसून नेवासा फाटा परीसरात प्रवास करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्या मुळे सर्वत्र खळबळ उडाली असून जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.त्यांनी सकाळी सकाळी गावातील देवीचे दर्शन घेऊन गोपाळपूर आणि खडका फाटा येथे भेट दिली.तसेच शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्रुक्षारोपणही केले.आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले. मंडल अधिकारी प्रीती मनाळ आणि ईतर खात्यातील अधिकारी यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे अभिष्टचिंतन केले.या प्रसंगी प्रारंभी शिवप्रतीमेचे पुजन आणि दीपप्रज्वलना नंतर दत्तू पोटे यांनी प्रास्ताविक केले.आजी माजी खासदार आणि आमदार यांना मोठ्या पुष्पहारात गुंफण्यात आले आणि शिरसगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्यदिव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, दादा होन,अंकुश काळे, नवनाथ साळुंके, तेजश्री लंघे, काशिनाथ नवले, प्रभाकर शिंदे, सचिन देसरडा, कपिल पवार,अशोक मिसाळ, बाळासाहेब पवार, श्रीकांत नवले, अब्दुलभाई शेख, सुनिल लंघे,अंकुश लंघे, राजेंद्र औटी, ऋषिकेश शेटे, सुरेश भीटे, अशोक कोळेकर, शशिकांत मतकर, किसनराव गडाख, सिद्धार्थ नवले, बबनराव पिसोटे, सुनिल मोरे,महेश गायकवाड हे आवर्जून उपस्थित होते.प्रीती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.