जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत मासिक शिक्षण परिषद संपन्न

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत मासिक शिक्षण परिषद संपन्न

गोराडखेडा उर्दू केंद्र मार्फत होणारा मासिक शिक्षण परिषद जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे संपन्न झाला.या मासिक शिक्षण परिषद चे आयोजक, लासगाव उर्दू शाळा व बांबरुड उर्दू शाळा हे होते.
कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी गोराड खेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख सलाउद्दीन सर हे होते. यावेळी शाईस्ता देशमुख, पाचोरा कन्या शाळा,जुबेर अली गोराडखेडा उर्दू शाळा, हैदर शाह बांबरुड उर्दू शाळा व तौफिक सय्यद अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा ह्या चार शिक्षक व शिक्षिका यांनी चांगल्या प्रमाणे मॉडल लेसन च्या नमुना शिक्षकासमोर प्रस्तुत केला. यावेळी पदवीधर शिक्षक शेख कदीर शब्बीर, उपशिक्षक शेख जावेद रहीम यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन केले. अध्यापन नमुना वर शिक्षिका सुमयया देशमुख, माजेदा अंजुम ,बुशरा सय्यद, नगमा फातेमा, शाहीन शेख, सलमा कौसर शेख,दिलारा शौकत, शबाना देशमुख, सुलताना जाफर यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख साहेबांनी कार्यालयीन माहिती शिक्षकांना दिली व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद जाफर सर व आभार अनिस शेख सर यांनी मांडले.