राहुल गांधीच्या शिक्षे विरोधात पाचोऱ्यात फाशी आंदोलन

राहुल गांधीच्या शिक्षे विरोधात पाचोऱ्यात फाशी आंदोलन

पाचोरा (प्रतिनिधी) – राहुल गांधी यांना शिक्षा देण्यात आली याचा निषेध म्हणून पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेस ने प्रतिकात्मक फाशी आंदोलन केले आहे.

 

देशात एकीकडे शहीद दिवस असतांना दुसरीकडे लोकशाही चा घोट घेतला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी येवुन एका कार्यकर्त्याने प्रतिकात्मक फाशी लावुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी तेरी ताना शाही नही चलेगी नहीं चलेगी… राहुल गांधी जिंदाबाद… राहुलजी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणांनी चौक दणाणला.. कॉग्रेस कार्यकर्ते आक्रोश करत होते. देशात हुकुमशाही हिटलरशाही सुरू झाली असल्याने विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. आंदोलनच्या वेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, एसी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, अमजद मौलाना, शंकर सोनवणे, अंबादास राठोड, मधुकर काटे, भगवान वाघ, रमेश गायकवाड, दिपक पाटील, शेख अजिज शेख नबी आदि उपस्थितीत होते. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती