“अहिल्यानगर” नामांतराला विरोध करणाऱ्या आणि आता फुकटचे श्रेय घेणाऱ्या जिल्ह्यातील आजी -माजी आमदारांचा जाहीर निषेध ?

“अहिल्यानगर” नामांतराला विरोध करणाऱ्या आणि आता फुकटचे श्रेय घेणाऱ्या जिल्ह्यातील आजी -माजी आमदारांचा जाहीर निषेध ?

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) ‌ पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर जिल्हा नामांतर क्रुतीसमिती च्यावतीने दि.९ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात जनजागृती साठी धनगर समाजाच्या वतीने रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या रथयात्रा जिल्हा नामांतर क्रुतीसमिती मध्ये (विजय तमनर)-राहुरी,(पत्रकार सुनिल नजन) पाथर्डी, रिटायर्ड डीवायएसपी (नारायण खाणू मोठे देसाई) कोल्हापूर,हभप (दिलिप महाराज चव्हाण) राहुरी ,(सचिन मार्कंड) नाशिक, (संतोष गुंजाळ) शेवगाव,(संजय वडितके) श्रीरामपूर, (बाळासाहेब विटनोर) राहुरी, (देवेंद्र लंभाते) इंदोर,(वैभव तमनर) राहुरी, (अरूण मतकर) जवखेडे,(पोपट बाचकर) राहुरी, (किशोर वडितके)गळनिंब, (भागवत खेडेकर) राहुरी, (महेश पिंपळे)धारुर बिड, आणि जामखेड येथील अहिल्यादेवीचे माहेरचे वंशज(अक्षय शिंदे) यांचा समावेश होता.ही रथयात्रा जामखेड तालुक्यातील चौंडी येथील अहिल्यादेवीच्या जन्म भुमी स्मारका पासुन कर्जत, सिद्धटेक, श्रीगोंदा, बेलवंडी,सुपा, राळेगण सिद्धी, पारनेर,भाळवणी, ढवळपुरी,ढोकी, टाकळी ढोकेश्वर,साकूर,अंभोरा, संगमनेर, तळेगाव,कोळपेवाडी, कोपरगाव, शिर्डी,राहता,वाकडी, श्रीरामपूर, बेलापूर, गळनिंब, भगवतीकोल्हार, चिंचोलीफाटा, राहुरी,मांजरी, अमळनेर, नेवासा, नेवासा फाटा,कुकाणा, भातकुडगाव ,शेवगाव, अमरापूर,पाथर्डी, कासारपिंपळगाव, जवखेडे, आडगाव,मीरी, चिचोंडी,शिराळ, खोसपुरी, धनगरवाडी,भिस्तबाग, माळीवाडा, केडगाव, भिस्तबाग नाका, श्रीराम चौक, गुलमोहोर रोड, आणि शेवटी २०फेब्रुवारी २०२३ला नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन आणि संपूर्ण जिल्ह्यातून जमा झालेले ठराव देण्यात येणार होते.अशा पद्धतीने या रथयात्रेचे आयोजन करण्यात होते. ही नामांतर रथयात्रा ज्या भागातून जाईल त्या भागातील आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष, सरपंच यांना भेटून नामांतर करण्यासाठीचे प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिकेचे ठराव , आमदारांच्या शिफारशी असे कागदपत्रे जमा करून जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाने जाऊन जमा करण्यात येणार होते.परंतू ही रथयात्रा संपूर्ण जिल्ह्यातून जात असताना काही चालू आमदार आणि काही माजी आमदार यांनी या रथयात्रेला अजिबात सहकार्य केले नाही. काही आमदारांनी ऊलट आपल्या गावातील ग्रामपंचायतीला या नामांतर रथयात्रेला ठराव न देण्याच्या सूचना देऊन रथयात्रेकडे पाठ फिरवली होती.आणि धनगर समाजाच्या रथयात्रेतील कार्यकर्त्यांची खिल्ली उडविली होती .त्या जिल्ह्यातील सर्व निष्क्रिय आजी माजी आमदारांचा धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. नाठाळ पुढाऱ्यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे नुसते आश्वासन देऊन गेली सत्तर वर्षे झुलवत ठेवले. आणि आता लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवून काल घाईघाईने महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर या नामांतराची घोषणा करून धनगर समाजाची बोळवण केली आहे. सरकारने हा येणाऱ्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. आणि नामांतर क्रुतीसमितीला विरोध करत सहकार्य न करणाऱ्या महाभाग आमदारांनी आता थेट नामांतराच्या घोषणेचे संपूर्ण जिल्ह्यात जोरदार स्वागत करीत संपूर्ण जिल्ह्याभर बॅनरबाजी करत फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.अशा स्वतःच्या स्वार्थासाठी धनगर समाजाचा वापर करून घेणाऱ्या व दुतोंडीपणाचा कळस गाठणाऱ्या बांडगुळी प्रव्रूत्तिला होउ घातलेल्या निवडणुकीत समाजाच्या वतीने चोख उत्तर दिले जाईल. सरकारने जिल्हा नामांतराचे गाजर दाखवल्याने व स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे आता आपल्याच टिरी बडवुन घेत आरक्षणाच्या बाबतीत फसवणूक केलेल्या सरकारच्या बाजूने अभिनंदनाचे ढोल बडवून घेत आहेत.हीच तर खरी शोकांतीकाआहे. समाजाच्या वतीने नेते गिरी करणाऱ्यांना ही झालेली फसवणूक कशी समजत नाही हेच खरे कोडे सर्व सामान्य धनगर समाजाला आता कळू लागले आहे.