गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण राज्यभर गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या बाबतची माहिती अशी की पैठण येथुन नगरकडे काही इसम गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येत आहेत अशी माहिती शेवगाव पोलिसांना समजताच त्यांनी नाकाबंदी करून भर चौकात सदर वाहनास पकडण्यासाठी ट्रॅप लावला असता एम एच 16 एबी 5454 या वाहनात बसलेल्या 1)मुक्तार सय्यद, सिकंदर नगर, अहिल्यानगर,2) दिपक गायकवाड, कल्याण रोड,अहिल्यानगर,3) सुलतान शेख, गोविंदपुरा,4)शेख अकीब जलील, मुकुंदनगर,5) अंकुश धोत्रे,बोरगाव या पाच जणांना पोलिसांनी पकडले.दुसरी गाडी एम एच 17 ए झेड 4199 या वाहनात 1)आवेज शेख,मिल्लतनगर, श्रीरामपूर,2) सोहेल कुरेशी,फातीमा सोसायटी,श्रीरामपूर,3)पापाभाई बागवान, श्रीरामपूर,असे दोन्ही गाड्यात एकूण आठ जण मिळून आले.त्यांच्या जवळील दोन्ही गाड्यांची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये दोन गावठी कट्टे,आठ जिवंत काडतुसे,चार मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला. शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 309/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक बक्कल नंबर 519 आदिनाथ तुकाराम वामन यांनी आठही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि शेवगाव पोलिसांनी गुन्ह्यातील आठही आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांना अटक केली आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांत खुलेआम गावठी कट्टे विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले आहेत.अनेकजण या गावठी कट्टयांचा उपयोग निवडणुकीत सर्व सामान्य माणसाला धमकावण्या साठी आणि यात्रा खेत्रात दहशत निर्माण करण्यासाठी करत आहेत.तसेच खाजगी कंपणीतील लोकाकडून खंडणी वसूल करण्यासाठी करत आहेत.संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक गावांत गल्लीतील दादाकडे गावठी कट्टयांचा सुळसुळाट झाला आहे आता जिल्ह्यातील विनापरवाना गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांनाही गजाआड करण्याची गरज निर्माण झाली आहे.या गावठी कट्टयामुळेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते.