पाचोरा येथे गुजर समाज बांधव व भगिनींची बैठक संपन्न

पाचोरा येथे गुजर समाज बांधव व भगिनींची बैठक संपन्न

 

आज दिनांक 16 एप्रिल 2023 रविवार रोजी ध्येय करिअर अकॅडमी पाचोरा येथे गुजर समाज बांधव व भगिनींची बैठक संपन्न झाली सदर बैठकीत दिनांक 8 एप्रिल, 2023 रोजी रावेर येथे संपन्न झालेल्या समाज बांधवांच्या सभेमध्ये पारित झालेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांचे काटेकोरपणे पालन करण्याचा ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आला

तसेच वरील विषया सोबतच पुढील विषयावर देखील साधक-बाधक चर्चा संपन्न झाली यात

1) लग्न आहेर देणे-घेणे बंद

2) महीला वधुकडे हळद घेऊन जाणार नाही

3) रुपया घालण्यास महीला जाणार नाही

4) निधन घरी गावात व बाहेरगावी चहा साखर घेऊन जाणे बंद तसेच मुलीकडून गोड पदार्थ देणे बंद

5) साखरपुडा शक्यतोवर करूच नये केल्यास छोटेखानी मर्यादित लोकांपुरता करावा यात साखरपुड्यास आलेल्या महीलांना साड्या देणे बंद

6) लग्नात सत्कार कार्यक्रम बंद

7) पत्रिका छापणे ते वाटायला जाणे तसेच घ्यावयास जाणे पद्धती बंद करून या ऐवजी सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करावा मेसेज व थेट कॉल करून निमंत्रण देणे यावर चर्चा व निर्णय घेऊन याचा प्रचार व प्रसार होणेसाठी

पाचोरा तालुका व परिसरातील गावांमध्ये जाण्याचे निश्चित करण्यात आले

गुर्जर समाजातील गावांमधील मान्यवर, बंधु-भगीनींशी चर्चा करून समाज बांधव व भगिनींची सभा घेण्याची निश्चित दिनांक- वेळ करीता संपर्कसाठी श्री. बी के पाटीलसर Mo.9226731078 डॉ. अविनाश पाटील Mo.9923168199 यांच्यावर जबाबदारी सोपवविण्यात आली

*आजच्या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे गाव पातळीवर सर्व संमतीने पारित झालेल्या या ठरावांचे पालन न करणाऱ्या परिवारास त्यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावातील समाज बांधवांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले.*

या बैठकीस

डॉक्टर जयंतराव पाटील, प्रकाश बा. पाटील ,डॉक्टर स्वप्नील पाटील , संदीप महाजन , डी एल पाटील ,पी डी पाटील , सू ची पाटील ,विनोद पाटील, गोविंद पाटील , अतुल महाजन , प्रल्हाद पाटील, राजाराम महाजन , डॉ अविनाश पाटील , आशिश पाटील , मनोज पाटील , जितेंद्र महाजन , दिपक पाटील , अशोक पाटील , ईश्वर देशमुख,बाबुलाल पाटील , गोविंद पाटील , प्रतिक महाजन, मेघा महाजन, ज्योती देशमुख, सुनिता पाटील, डॉ. सोनाली पाटील, सुवर्णा पाटील , डॉ संगीता पाटील , रेखा महाजन , शितल महाजन, शितल पाटील, तृप्ती पाटील, स्वाती पाटील , अर्चना महाजन, स्वाती महाजन, संजीवनी पाटील उपस्थीत होते.