जळगाव परिमंडळातील सर्कल,विभागीय कार्यालयानसमोर १६ फेब्रुवारीला द्वार सभा घेऊन भव्य निदर्शने

द्वार सभा!! द्वार सभा!!! द्वार सभा!!!!🚩🚩🚩🚩🚩🚩 जळगाव परिमंडळातील सर्कल,विभागीय कार्यालयानसमोर १६ फेब्रुवारीला द्वार सभा घेऊन भव्य निदर्शने

१६ फेब्रुवारी देशभरातील लाखो वीज कर्मचारी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात हैदराबाद येथील राष्ट्रीय अधिवेशनात खालील झालेल्या ठरावानुसार देशभर निदर्शने करणार आहेत*

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे १६ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी हैदराबाद येथे सपंन्न झाले. या अधिवेशनामध्ये कन्याकुमारी पासून ते कश्मीर पर्यंतच्या २८ राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील निवडून आलेले विविध युनियनचे ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते.या अधिवेशना मध्ये देशातील वीज उद्योगाची सध्याची परिस्थिती,नवीन विद्युत कायदा २०२२,केंद्र व राज्य सरकारचे सरकारच्या मालकीच्या वीज कंपन्या बाबतचे धोरण,फेचाईशी करण,समांतर वीज वितरण परवाना देण्याचे धोरण बंद करणे,वीज कंपनीतील कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगारांना कायम करणे,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान काम समान वेतन लागू करणे,त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे,वीज उद्योगातील लाखो रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे, तरुणाकरीता रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे, देशातील सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण बंद करणे,१०० च्या वर रद्द केलेले कामगार कायदे बहाल करणे इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा झाल्यानंतर खालील ठराव प्रतिनिधी अधिवेशनामध्ये बहुमताने पारित करण्यात आले
१) देशातील सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण बंद करा.
२)  सुधारित विद्युत कायदा २०२२ वापस घ्या.
३) दि.१६ फरवरी २०२४ रोजी केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी बेरोजगार विरोधी धोरणाच्या विरोधात सेंट्रल ट्रेड युनियन व संयुक्त किसान मोर्चा यांनी पुकारलेल्या आंदोलनास सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
४) उत्तर प्रदेश मधील कामावरून काढून टाकलेल्या ३००० हजार कंत्राटी कामगारांना परत कामावर घ्या.
५) सर्व कंत्राटी/बाह्यस्त्रोत कामगारांना नियमित करा.
६) देशभरातील वीज कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
७) वीज कंपन्यातील मंजूर रिक्त पदे तात्काळ भरा.
८) समान काम समान वेतनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा.
९) देशभरातील वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण बंद करून वीज ग्राहकाच्या हिताचे संरक्षण करा.

वरील मागण्या पूर्ण करण्यासाठी देशभरातील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्पलॉईज चे
लाखो कर्मचारी,अभियंते,अधिकारी व कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार दिनांक १२ मार्च देशातील विद्युत मंडळे व वीज कंपन्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करतील असा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने जळगाव परिमंडळातील सर्व मंडल व विभागीय कार्यालयासमोर १६ फेब्रुवारी रोजी भव्य निदर्शने करून बहुसंख्य उपस्थितीत द्वार सभा घ्यावयाच्या आहेत तरी सर्व सर्कल प्रमुख सर्कल सचिव व विभागीय प्रमुख विभागीय सचिव यांनी जोरदार तयारी करावी असे निर्देश होते त्यानुसार

जळगाव परिमंडळ कार्यालय समोर द्वारसभा आज दि .१६/०२/२०२४ दुपारी 13.30 वाजता सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते.संघटनेचे संयुक्त सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी शेतमजूर सामान्य माणसाला देशोधडीला लावण्याचा धोरणाचा निषेध करून खरपूस शब्दात समाचार घेतला.कॉ.श्रीमती संध्या पाटील मैडम केंद्रीय महिला आघाडीच्या सदस्या यांनी सुध्दा आजच्या आंदोलन चे महत्व विषद केले.सदर द्वार सभा यशस्वी करण्यासाठी विभागीय सचिव जळगाव कॉ.किशोर जगताप, कॉ.हेमंत बारी,कॉ.शरद बारी, कॉ.सागर पाथरवट,कॉ.निलेश भोसले,कॉ.शरद पवार,कॉ.मोनी बारेला,कॉ.गणेश सातपुते, कॉ.गिरीष बर्हाटे व सभासद पदाधिकारी उपस्थित होते.