स्व.प्रमोदराव बाबुराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा (आय टी आय) निंबोडीफाटा येथे उद्घाटन सोहळा संपन्न

स्व.प्रमोदराव बाबुराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा (आय टी आय) निंबोडीफाटा येथे उद्घाटन सोहळा संपन्न

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठ मुंबई शाखा तिसगाव संचलित स्व. प्रमोद बाबुराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा निंबोडीफाटा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर,येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परीषदेचे आमदार,आणि संस्थेचे अध्यक्ष प्रसादजी लाड साहेब,क्रिस्टल गृपच्या संचालीका सौ.निताताई लाड, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे,जिल्हा बँकेचे नुतन संचालक अक्षय कर्डिले हे होते. माजी आमदार स्व.बाबुराव भापसे यांच्या ३२व्या पुण्य स्मरणाचे निमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.नंतर स्व.बाबुराव भापसे,व स्व.प्रमोदजी भापसे,आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण करून पूजन करण्यात आले. नंतर भाजपाचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव कुशलजी प्रमोद भापसे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या प्रगती पथावर असलेल्या विविध विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली.संस्थेचे अध्यक्ष प्रसादजी लाड साहेब यांना मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भातील कोअर कमिटीच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश येताच ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.तत्पुर्वी ते उपस्थित जन समुदायास संबोधित करून गेले.जाता जाता त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत किमान दीडशे पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील असा विश्वास व्यक्त केला.नंतर संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी आमदार मोनिकाताई राजळे,अक्षय कर्डिले,आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिक प्रशिक्षण संस्था किती महत्त्वाची आहे हे सांगताना या संस्थेने काळाची पावले ओळखून या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दिल्या त्या बद्दल संस्थेचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजी दहातोंडे, व्यवसाय प्रशिक्षण संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे सहसंचालक अमित गावित, अहिल्यानगर जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सुनील बी शिंदे, राजू मामा तागड, विजयजी कोरडे, संभाजी वाघ, संभाजी पालवे, काशिनाथ पाटील लवांडे,चारुदत्त वाघ,पाथर्डीचे नगराध्यक्ष अभयजी आव्हाड,ज्ञानेश्वर कराळे महाराज,फसले महाराज,संगिता भापसे मॅडम, एकनाथ आटकर, सचिन वायकर, पृथ्वीराज आठरे, नंदू लोखंडे सर , बाबासाहेब बर्डे,कुशिनाथ बर्डे,यांच्या सह या संस्थेच्या सर्व शाखांचे शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रिती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.संपुर्ण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्र संचालन उद्धव काळपहाड यांनी केले.