अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे सांज पाडवा चे आयोजन

अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे सांज पाडवा चे आयोजन

पाचोरा – येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे आज दिनांक 5 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता, स्वामी लॉन्स पाचोरा येथे ‘थोड्या गप्पा.. थोडी गाणी, या बहारदार मराठी सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे

सांज पाडवा असे या कार्यक्रमाचे शिर्षक आह. अटल पणन योजनेचे ब्रँड ॲम्बेसिडर श्री गणेश शिंदे दिग्दर्शित – थोड्या गप्पा थोडी गाणी – या कार्यक्रमात मराठी कलर्स वाहिनी वरील सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या महाविजेत्या सौ सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर आवाजात मराठी गीतांचे गीतांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. भडगाव रोड वरील श्री गजानन पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या स्वामी लॉन्स येथे आयोजित या मनोरंजक उद्बोधक कार्यक्रमाला समस्त पाचोरा वासीयांनी उपस्थित राहावे , असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी केले आहे.