कुंटणखाना चालवणाऱ्या नारंग बंधूंच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या, मुख्य आरोपी ससाणे ही गजाआड
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) कुंटणखाना चालवणाऱ्या नारंग बंधूं आणि मुख्य आरोपी ससाणेला पोलीसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.आणि एका परप्रांतीय गरीब महीलेची सुटकाही केली आहे. मोठ्या शहाजूक पणाचा आव आणून अनेक महीलांचे शोषण करुन समाजात तोरा मिरवीत वावरणाऱ्या नारंग बंधूंच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.या नारंग बंधूंचे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी महीलांच्या संबंधित असणारे अनेक गैर उद्योग सुरू आहेत.ग्रामीण भागातील गरीब,गरजू, परीस्थितीने गांजलेल्या गरजवंत महीला शोधून त्या थेट नगर शहरातील कुंटणखान्यावर पोहोच करायच्या आणि वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून दलाली करत ऐश आराम करायचा हा कुमार नारंग आणि महेंद्र नारंग या दोघा बंधूंचा उद्योग होता. या बाबतची माहिती अशी की रविवारी सायंकाळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, अंमलदार निता अडसरे, विशाल दळवी, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, संकेत धिवर, सचिन लोळगे, प्रतिभा नागरे यांचे एक पोलिस पथक तयार करण्यात आले होते.कारण गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार गणेश ससाणे,ओम काॅलणी, अहिल्यानगर शहर,हा गोरगरिब,परीस्थितीने गांजलेल्या,पैशाची गरज असलेल्या गरजवंत महीला कडून देहव्यापार करून घेत आहे.अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर लगेचच छापा टाकण्यासाठी हे पोलिस पथक तयार करण्यात आले होते.मग एका पोलिस अंमलदाराला अगोदर पंचनामा करून बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आले.सदर क्रृष्णा लॉजमध्ये अगोदर सदर नोटेचा नंबर लिहून ठेवलेली पाचशे रुपयांची नोट ससाणेला देउन एक महीला मागवली.त्या नंतर ठरलेल्या खाणाखुणा केल्या नंतर पोलिस पथकाने क्रुष्णा लाॅजवर छापा टाकला असता काउंटरवर बसलेला इसम हा गणेश ससाणे असल्याची पोलीसांनी खात्री केली.त्याने एका खोलीत एक महीला आणि एक ग्राहक असल्याचे कबूल केले.पोलीसांनी सदर खोलीची झाडाझडती घेतली असता त्या खोलीत बनावट ग्राहक म्हणून पाठवलेले पोलिस अंमलदार यांच्या सोबत एक पश्चिम बंगाल येथील महिला आढळून आली.सदर महीलेकडे चौकशी केली असता तीने गणेश ससाणे याचे या धंद्यातील दोन साथीदार कुमार शामलाल नारंग,व महेंद्र शामलाल नारंग हे दोघे जण आपल्या समाजातील पैसेवाले आणि ऐश आराम करणारे ग्राहक शोधून त्यांना या महीलेकडे पाठवून देउन आलेल्या पैशातून दलाली करण्याचे काम करीत होते.अशी माहिती मिळाली होती.मग पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार गणेश ससाणे वय (वर्षे ४२), कुमार शामलाल नारंग वय (वर्षे ४०), महेंद्र शामलाल नारंग,राहणार स्टेशन रोड,बेल्हेकर कॉलनी,आगरकर मळा,अहिल्यानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे.नारंग बंधुचे मोसंबी नारंगीच्या जिवावर ऐश आराम करण्याचे दिवस आता संपले आहेत.त्यांना आता जेलची हवा खावी लागत आहे.