पाचोऱ्यात स्वर्गीय अमोल शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील बाहेरपुरा भागातील बोहरा हॉल येथे आज दिनांक2 रोजी मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया      शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

स्वर्गीय अमोल शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त व काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष राहुल शिंदे यांच्य वाढदिवसा निमित्त डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव आणि सचिन सोमवंशी युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया व बिन टाक्याचे फेको पद्धतीने अल्कोन इफिनीटी ओझील अमेरिकन फेको मिशन द्वारे तपासणी करण्यात येणार आहे सदरच्या शिबिरातील रुग्णांनाचे डोळ्याच्य पडद्याचे स्कॅन व डोळ्याच्या पडद्याचे सोनोग्राफी व डोळ्यांच्या पडद्यासाठी लेझर सुविधा पडद्यांची बिनाटाक्याची शस्त्रक्रिया मोफत स्वरूपात होणार आहे सदर चे शिबीर हे बाहेरपुरा भागातील कामगार कल्याणच्या शेजारी बोहरा हॉल येथे सकाळी 10 ते 2 पर्यंत तपासणी होणार आहे शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आयोजकांनी आव्हान केले आहे