पाचोर्यात इंधनवाढ विरोधात मोटारसायकल प्रतिकात्मक फाशी

पाचोर्यात इंधनवाढ विरोधात मोटारसायकल प्रतिकात्मक फाशी

पाचोरा (प्रतिनिधी संदीप तांबे ) पाचोरा कॉग्रेस कडुन इंधनवाढ निषेधार्थ भाजपा च्या मोदी सरकार च्या विरोधात मोटारसायकला प्रतिकात्मक फाशी देण्यात येवुन आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले भाजपा मोदी सरकार च्या वाढत्या इंधनवाढ विरोधात राज्यव्यापी कॉग्रेस चे आंदोलनात पाचोरा कॉग्रेस ने मोटरसायकला प्रतिकात्मक फाशी दिली . तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गजानन पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या रस्त्यावरील झाडावर दोन मोटारसायकला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी.. मोदी सरकार हाय हाय.. सामान्य जनतेची हाय घेणार्‍या मोदी सरकार चा निषेध असो अशा घोषणा करण्यात आल्या. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, जगदीश ठाकरे, शिवराम पाटील, शीला सुर्यवंशी, सागर वाघ, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, इस्माईल तांबोळी, सागर पाटील, संदीप पाटील, मदन देवरे आदी उपस्थित होते.या आगळे वेगळे आंदोलनाची चर्चा शहरात सुरू आहे