रा.से.यो.धरणगाव महाविद्यालयात विशेष श्रम संस्कार शिबिराच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात आले

रा.से.यो.धरणगाव महाविद्यालयात विशेष श्रम संस्कार शिबिराच्या तिसऱ्या
व चौथ्या दिवशी खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात आले.
 सकाळ सत्रात विद्यार्थी  स्वयंसेवकांनी,प्रथम योगासने नंतर  श्रमदान केले तर दुसऱ्या ग्रुप ने आधार कार्ड नोंदणी, आयुष्यमान कार्ड नोंदणी, निवडणुक कार्ड नोंदणी सर्वेक्षण स्वयंसेवकांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थिनी  आपत्ती व्यवस्थापन शिबिरात विवीध  प्रकारच्या आपत्ती बाबतीत प्रात्यक्षिक करून दाखविले. दुपार सत्रात डॉ. हेमंत बाहेती, कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र ,जळगाव यांनी कृषी क्षेत्रातील समस्या व उपाय या विषयावर तर डॉ. नरेन्द्र ठाकूर यांनी अवयवदान एक काळाची गरज या विषयावर व्याख्यान दिले.
दि.6-2-24 रोजी  कै.बी.जे.महाजन विद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे निमित्ताने पशुसंवर्धन विभाग यांचे कार्य मोहीम शिबिर घेण्यात आले.उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्याना डॉ.अशोक महाजन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत स्वयंरोजगार निर्मिती बाबत सखोल मार्गदर्शन करून जास्तीत जास्त अर्ज सादर करावेत व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व पशुपालकांना सुद्धा ही माहिती द्यावी असे आवाहन केले तसेच जनावरांचे NDLM नोंदी बाबत विस्तृत माहिती दिली व स्वतः 1962 NDLM app वापर करणे बाबत माहिती दिली. डॉ.अनिल कोरडे पशुधन विकास अधिकारी यांनी रेबिज विषयी  माहिती देऊन त्यापासून बचाव व प्रतिबंध बाबत सविस्तर चर्चा केली. डॉ.गौरव सुर्यवंशी पशुधन विकास अधिकारी यांनी आहारातील प्रथिनांचे महत्त्व तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजना या बाबत माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यानी विचारलेल्या शंकाचे निरसन करून सखोल माहिती देण्यात आली.
शिबिरात जनावरांचे लसीकरण,औषोधोचार, गर्भतपासनी,वंध्यत्व तपासणी,गोचीड निर्मूलन इ.करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.शिबिरात डॉ.कोरडे, डॉ.सुर्यवंशी,तसेच पशुधन पर्यवेक्षक डॉ.जितेंद्र साळुंखे, डॉ.गोकुळ साळुंखे,श्री.समाधान पाटील यांनी कामकाज केले.
दुपारच्या सत्रामध्ये थॅलेसेमिया निदान या विषयावर डॉ. सई नेमाडे यांनी व्याख्यान दिले. आजचा ग्रुप मंदाकिनी आमटे यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत केले व आभार मानले.