गटसाधन केंद्रातर्फे प्रा.शिवाजी शिंदे यांचा सत्कार

गटसाधन केंद्रातर्फे प्रा.शिवाजी शिंदे यांचा सत्कार

पाचोरा- येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. शिवाजी शिंदे यांचा आज दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी गटशिक्षणाधिकारी माननीय नरेंद्र चौधरी यांचे हस्ते गट साधन केंद्र पाचोरा येथे सत्कार करण्यात आला.

समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व शिक्षण क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करणारे प्रा. शिवाजी शिंदे यांना नुकताच महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार व भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांचे तर्फे डॉ.आंबेडकर फेलोशिप अवार्ड हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

“पाचोरा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेचा आदर्श हा निश्चितच प्रशासनीय आहे, येथील गुणवंत शिक्षकांचा सुगंध राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत दरवाळल्याचा मला आनंद आहे. यापुढेही आपण असेच कार्य करत राहावे व तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा गटशिक्षणाधिकारी माननीय नरेंद्र चौधरी साहेब यांनी शिवाजी शिंदे यांना दिल्या. याप्रसंगी शिक्षक संघटनेचे नेते प्रवीण पाटील, नरेंद्र शिरसाळे, सुनील शिवदे, आदी मान्यवर उपस्थित होते