श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे प्रजासत्ताक दिवस साजरा

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे प्रजासत्ताक दिवस साजरा

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल पाचोरा. येथे शालेय समिती चेअरमन खलील देशमुख .यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शाळेचे उपमुख्याध्यापक एन. आर .पाटील. यांना मिळाल्याने त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळवल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार व खाऊच्या डब्यातून शिल्लक असलेल्या पैशातून काही विद्यार्थ्यांनी शाळेला ग्रंथालयाला श्यामची आई हे पुस्तक देऊन एक आगळावेगळा विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला . स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स ,घुंगरू काठी ,करेले यांचे पाच कवायतीचे प्रकार प्रदर्शित केले.यावेळी तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, माजी मुख्याध्यापक सुरेश पवार, एस.
डी .पाटील, सुधीर पाटील, पर्यवेक्षक शांताराम चौधरी, ए.जे .महाजन. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन आर पाटील पर्यवेक्षक आर .एल .पाटील. ए .बी .अहिरे. सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी, आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन रवींद्र बोरसे . यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.