कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून शैक्षणिक अंकेक्षण यादी जाहीर (चोपडा येथील वरिष्ठ महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून शैक्षणिक अंकेक्षण यादी जाहीर
(चोपडा येथील वरिष्ठ महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त)

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे मागील तीन वर्षाचे शैक्षणिक अंकेक्षण म्हणजेच अकॅडेमीक ऑडिट करण्यात आले.
या अकॅडेमीक ऑडिट झालेल्या महाविद्यालयांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाला ‘ए’ ग्रेड प्राप्त झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे महाविद्यालयाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज तसेच प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातर्फे राबविलेल्या विद्यार्थी हिताच्या योजना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले विविध उपक्रम, सक्षम नागरिक म्हणून युवकांसाठी राबवले गेलेले कार्यक्रम, विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश, महाविद्यालयाचा निकाल, प्राध्यापकांचे संशोधन कार्य, महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी पुरविल्या गेलेल्या पायाभूत व आधुनिक सोयी सुविधांची माहिती, प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, तसेच विद्यापीठस्तरीय चर्चासत्रांमध्ये नोंदवलेला सहभाग तसेच शोधनिबंधांचे केलेले सादरीकरण, प्रकाशित शोधनिबंध व पुस्तके, ग्रंथालयातील सोयीसुविधा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी राबवल्या गेलेल्या विविध योजना, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेले पुरस्कार, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विकासात दिलेले योगदान, शिक्षक पालक योजना, फीडबॅक पद्धती, विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयातर्फे केले गेलेले विविध सामंजस्य करार, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राबवल्या गेलेल्या विविध योजना, सामाजिक उपक्रम इत्यादींची माहिती ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आली होती. माननीय कुलगुरू महोदयांनी गठित केलेल्या समितीने विद्यापीठास प्राप्त झालेले अर्ज तसेच प्रस्ताव व त्या अनुषंगाने सादर केलेल्या पुराव्याची खातरजमा करून महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा बहाल केला. या शैक्षणिक अंकेक्षणाद्वारे महाविद्यालयाला सलग दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या ‘अ’ दर्जाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन.सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस.ए.वाघ यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व शाखांचे उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी सलग दुसऱ्यांदा महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा राखून उत्कृष्ट ग्रेड मिळवून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी अंकेक्षण समितीचे समन्वयक डॉ.एच.जी.सदाफुले, IQAC चे समन्वयक डी.एस.पाटील, डॉ.के.डी गायकवाड, डॉ. पी.के.लभाने, डॉ.के.एस.भावसार, डॉ.बी.एम.सपकाळ, श्रीमती. के.एस. क्षीरसागर,डॉ. पी.एम.रावतोळे, डॉ.एम.एल.भुसारे, डॉ.एच.जी.चौधरी, डी.डी.कर्दपवार, रजिस्ट्रार डी.एम.पाटील, व्ही.एम.पाटील, एस.ओ. बारी, प्रदीप बाविस्कर या सर्व समिती सदस्य तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.