प्रकाश तेली यांच्या प्रकृति की महत्ता कविता संग्रहाचे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव :- ग्रँडमास्टर, काव्यसम्राट, लेखक, गीतकार व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांच्या प्रकृति की महत्ता ह्या हिंदी कविता संग्रहाचे प्रकाशन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष व मा. जिल्हाधिकारी भारत सासणे यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्यावेळी जेष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त सनदी अधिकारी भारत सासणे यांनी प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे कौतुक करुन अभिनव कार्याबद्दल अभिनंदन केले व अशी अभिनव व सामाजिक पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे असे मत व्यक्त केले.
काय आहे प्रकृति की महत्ता कविता संग्रहाची विशेषता :-
निसर्ग आपल्या सर्वांसाठी एक अविश्वसनीय काम करतो. निसर्गाकडून आपल्याला जे काही मिळते, ते जगातील अन्य कोणत्याही माध्यमातुन मिळत नाही. आपण इतर काही घटकांशिवाय राहू शकतो, परंतु निसर्गाकडून मिळणाऱ्या घटकांशिवाय जगणे अशक्य आहे. निसर्ग आपल्याला जीवन आणि प्रेरणा दोन्ही गोष्टी देत असतो कारण निसर्ग हा वास्तविक जीवनाचा आधार आहे. आपले जीवन सोपे करण्यात निसर्गाची खुप महत्त्वाची भूमिका आहे. चांगले अन्न आणि चांगले आरोग्य हे निसर्गाशिवाय शक्य नाही.
संपूर्ण सजीव सृष्टीचे अस्तित्व हे निसर्गावर अवलंबून असून निसर्गाकडून आपल्याला जे काही मिळते, ते आपल्या सर्वांना निर्माण करणे शक्य नाही, यावरून निसर्गाच्या अद्भुत शक्तीची कल्पना येते. आज सर्वीकडे वाढत्या प्रदूषणामुळे आणि पर्यावरणातील बदलांमुळे जनजीवन हे विस्कळीत होत आहे आणि यामागील मुख्य कारण म्हणजे निसर्गावरील आक्रमण.
आजही जगात असे काही लोक आहेत ज्यांना निसर्ग म्हणजे काय, निसर्गाकडून त्यांना काय मिळते हे याची देखील माहिती आणि जाणीव नाही. निसर्गाच्या पर्यावरणीय फायद्यां व्यतिरिक्त, इतर अनेक फायदे आहेत याची आठवण करून देणे आज आवश्यक झाले आहे. मनुष्याने कितीही स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला तरी त्याला निसर्गावर अवलंबून राहावेच लागेल, यात तीळमात्र शंका नाही.
निसर्ग आपल्याला सर्व काही मोफत देतो आणि असे म्हटले जाते की मोफत वस्तू मौल्यवान वाटत नाहीत, त्यामुळे आपण सर्वजण निसर्ग संवर्धन हलक्यात घेत आहोत आणि स्वार्थासाठी निसर्गाला हानी पोहोचवण्याचे काम करीत आहोत, ज्यामुळे मोठे अपघात होत आहेत, तरीही आपल्या वागण्यात कोणताही बदल होत नाही, म्हणून यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. ज्याप्रमाणे निसर्ग आपल्याला निःस्वार्थपणे देतो, त्याचप्रमाणे जर आपण त्याची निःस्वार्थपणे सेवा केली तर देशाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.
या काव्यसंग्रहात, मी निसर्गाचे महत्त्व आणि त्यावर होणारा अन्याय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कविता संग्रहात निसर्गाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करणाऱ्या वेगवेगळ्या शीर्षकांच्या कविता आहेत.
अनेक मान्यवर यांच्याकडून प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे कौतुक :-
प्रकाश तेली हे सामाजिक आणि संवेदनशील कवी असून त्यांनी अनेक सामाजिक व अन्य विषयांवर 5000 पेक्षा जास्त कविता व 7000 पेक्षा जास्त घोषवाक्य लिहिलेले आहेत. प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे पद्य, भारतरत्न, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मान्यवर पासून ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकानी कौतुक केले असून अनेक मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे आणि त्यांच्या भावी साहित्य कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रकाश तेली यांचे कविता संग्रह हे हृदयाला स्पर्श करणारे व दिशादर्शक आहेत असे अनेक मान्यवर यांनी त्यांच्या शुभेच्या संदेशात म्हटले आहे.
प्रकाश तेली यांचे आतापर्यंत 17 कविता संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांनी कविता व घोषवाक्य लेखनाचा विश्वविक्रम देखील केलेला आहे त्यांच्या कार्याची रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली असून त्यांचे लवकरच जीवन म्हणजे काय हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे.
प्रकाश तेली यांनी समाज प्रबोधनासाठी बनवलेत चार सामजिक गाणे:-
सामाजिक साक्षरता जागरूकता अभियानासाठी तसेच सहज व सोप्या भाषेत गोष्टीचे महत्व समजावे यासाठी प्रकाश तेली यांनी आतापर्यंत 4 सामाजिक गीत प्रसिद्द केले आहेत. लवकरच काही गीत देखील प्रसिद्द होणार आहेत.
प्रकाश तेली यांच्या काव्य संग्रहाचे पंतप्रधान कार्यालय, उपराष्ट्रपति कार्यालय, राज्यपाल अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ज्ञानपीठ व पद्मश्री पुरस्कार प्राप्त लेखक व अनेक महनीय व्यक्तीनी गौरव केला आहे.