पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेस चे गांधीगिरी आंदोलन

पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेस चे गांधीगिरी आंदोलन
डेंगु च्या थैमानाने नागरिक त्रस्त

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील नागरिक डेंगु मलेरिया या साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद समोर गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

पाचोरा शहरात डेंगु, मलेरिया या डांसापासुन होणाऱ्या साथीच्या आजाराने थैमान घातले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने आज गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन केले यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी यांनी चक्क फवारणीचे पंपानी औषधाची फवारणी कार्यालया बाहेर केली यावेळी नगर परिषद ने स्वच्छता पंधरवडा या सेल्फी फलकावर देखील फवारणी केली. कॉंग्रेस पदाधिकारी यांच्या घोषणांनी परीसर दणाणले यात झोपलेल्या पालीकेला जागे केले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा सदस्य प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, एस सी सेल अध्यक्ष श्रावण गायकवाड,अल्पसंख्याक शहर फईम खान नासेर खान, अध्यक्ष कृष्णा वडणेरे, सलीम शेख, राजु भदाणे, मेहमूद यासिन, अझर शेख, लक्ष्मण पाटील, रवी सुरवाडे, साबिर टकारी, सादीक खाटीक, रमजान खाटीक,अनिस खाटीक, संदीप पाटील, आदींनी आंदोलनात सहभागी झाले यावेळी आंदोलकरांना नगर परिषद चे उपमुख्याधिकारी मराठे समोर येवुन तातडीने मागण्या मान्य केल्या. शहरात या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा होती. कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परीधान केली होती. तर दोन पंपानी फवारणी केली.. पालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.