पाचोरा एम. एम. महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पाचोरा एम. एम. महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

(पाचोरा प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा जि: जळगाव येथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, दक्षता समितीचे चेअरमन सुभाष तोतला, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे प्रमुख सुरेश देवरे, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा डॉ जे व्ही पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा जी बी पाटील, पर्यवेक्षक प्रा संजू एम पाटील, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची उद्देशिकेचे याप्रसंगी सामूहिक वाचन करण्यात आले. तायकांदो या क्रीडा प्रकारात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाची अकरावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु ऋतिका खरे व तिचे मार्गदर्शक तालुका क्रिडा समन्वयक प्रा गिरीश पाटील यांना याप्रसंगी संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.